
Marathi Actress : नवीन वर्षातील महिलांचा पहिला सन म्हणजे मकरसंक्रांत. नुकताच मकरसंक्रांतीचा सण राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
तिळगूळ, पतंग, शुभेच्छा आणि गोडवा पसरवणारा हा सण सर्वत्र आनंद देणारा असला तरी मराठी अभिनेत्री मानसी सुरेश हिच्यासाठी हा सण मात्र अत्यंत दुःखद ठरला आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशीच मानसी सुरेशच्या घरातील अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अभिनेत्रीची भावुक पोस्ट
या दुःखद घटनेनंतर मानसी सुरेशने तिच्या सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करत आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने आपल्या काकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्याशी असलेलं भावनिक नातं उलगडून दाखवलं आहे. मानसीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘काका… (खरं तर आजोबा). पप्पांनंतर तुम्हीच होतात. मकरसंक्रांतीसारख्या एवढ्या चांगल्या आणि गोड दिवशी आमचा गोड माणूस आम्हाला सोडून गेला, अजूनही विश्वास बसत नाहीये. जेवढं सोबत राहता आलं, जेवढं करता आलं ते केलं. पण अजून हवंच होतं… बस्स, तुमच्या आठवणींत जगत राहणार, तुमच्याबद्दल गप्पा मारत राहणार. तुमचा आशिर्वाद कायम असुद्या.’ असं तिने म्हटलं आहे.
मानसी सुरेशची ही भावनिक पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांसह अनेक सहकलाकार आणि मित्रपरिवाराने तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट्सद्वारे श्रद्धांजली वाहत तिच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे.
View this post on Instagram
अनेक मालिकांमध्ये केलंय काम
दरम्यान, मानसी सुरेश ही मराठी टीव्ही क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘शिवा’, ‘स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा’ यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अभिनयासोबतच मानसी सोशल मीडियावरही सक्रिय असून ती आपल्या करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते.
मकरसंक्रांतीसारख्या आनंदाच्या दिवशी तिच्या कुटुंबावर आलेल्या या दुःखद घटनेमुळे मानसी आणि तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून तिच्या चाहत्यांकडून तिला मानसिक बळ मिळो अशीच सदिच्छा व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply