• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालातील या मुद्द्यामुळे मोठी खळबळ, उंची राखण्यात..

February 6, 2026 by admin Leave a Comment


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईहून 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीला अजित पवार निघाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून 8.10 ला निघाले. मात्र, बारामती विमानतळाच्या अगदी जवळ 8.45 ला अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात एकही जण वाचू शकले नाही. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी झाले. त्यानंतर काही मिनिटांमध्ये अजित पवार यांच्या निधनाची बातमी पुढे आली. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी काही तासातच उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घेतली. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पहिली मोठी प्रतिक्रिया देत म्हटले होते की, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अनेकांनी संशय व्यक्त केला. अजित पवार यांचा अपघात नक्की कसा झाला, यावर लोक संशय व्यक्त करत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा व्हिडीओही पुढे आला. व्हिडीओमध्ये आकाशात एका बाजूला विमान कोलमडताना स्पष्ट दिसत होते. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चाैकशी लावण्यात आली.

आता अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत चाैकशी प्राथमिक अहवाल निरीक्षण पुढे आले.  तांत्रिक समस्यांमुळे पायलटला धावपट्टीची योग्य दिशा आणि उंची राखण्यात अडचण आली असावी, असे प्राथमिक अहवाल निरीक्षणात पुढे आले धावपट्टीचा अंदाज घेण्यात झालेली ही चूक विमानाची गती आणि इंधन स्थिती लक्षात घेता जीवघेणी ठरली.

अशी काही महत्वाची निरीक्षणे प्राथमिक अहवालात नोंदविण्यात आली आली. विमान अपघाताबाबतचा सविस्तर चौकशी अहवाल समोर आल्यानंतर याबाबत आणखी स्पष्टता येईल, असेही सांगितले जाते. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल मोठा संशय व्यक्त करताना खासदार बजरंग सोनवणे यांनी थेट गंभीर आरोप करत म्हटले की, विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वीच स्फोट झाला होता.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
  • Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई
  • Horoscope : 13 एप्रिलचा दिवस खूपच खास, 3 राशींसाठी पैशांचा दुर्मिळ योग; वाचा नशीब कसं फळफळणार?
  • IPL 2026: शुबमन गिलकडून नव्या विक्रमाची नोंद, 4000 धावा करत विराटच्या पुढे निघून गेला
  • लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सेक्सची मागणी करणारा गोकुळ चव्हाण कोण? या आधीही एका महिलेला… धक्कादायक माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in