• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्णय, पहिलाच…

February 2, 2026 by admin Leave a Comment


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंबिय एकत्र दिसले. मात्र, त्यानंतर लगेचच पवार कुटुंबातील वाद पुढे आला. शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगताना शरद पवार दिसले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. मात्र, जय पवार सोडता या शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोणीही नव्हते. पार्थ पवार सुनत्रा पवार यांच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्या भेटीली पोहोचला होता.

सुप्रिया सुळे यांनीही मी दिल्लीला जात असून मला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र, ज्यावेळी पार्थ पवार आई सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन बारामतीमध्ये आला होता, त्यावेळी त्या बैठकीला सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर सुनेत्रा पवार कामालाही लागल्याचे बघायला मिळतंय.

डोंगरा इतके दु:ख आयुष्यात असताना सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्याप्रमाणेच कामाचा धडाका सुरू केला. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार या आज कराड आणि फलटणच्या दाैऱ्यावर आहेत. सुनेत्रा पवार आज सकाळीच साताऱ्याकडे रवाना झाल्या. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांचा पहिलाच शासकीय दौरा आहे.

10 वाजता कराड येथे सुनेत्रा पवार या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी दर्शन घेणार आहेत. त्यानंतर फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जात अजित पवारांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार आहेत. त्यानंतर त्या बारामतीकडे रवाना होतील. शरद पवार हे कालच मुंबईत आले. रोहित पवार देखील मुंबईत असल्याची माहिती मिळत आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
  • Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in