• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अजितदादांची शपथ घेऊ सांगतो… राष्ट्रवदीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा खळबळजनक दावा; सगळं सांगून टाकलं!

February 1, 2026 by admin Leave a Comment


अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. येत्या 12 फेब्रवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार होते असा दावा अनेक नेत्यांनी केली आहे. तसेच याबाबत शरद पवार यांनीही अजित पवार आणि माझ्यात या विषयाची चर्चा झाली होती असं विधान केले आहे. जयंत पाटील यांनीदेखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्यासाठी अनेक बैठका झाल्या होत्या अशी माहिती दिली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये एकत्रिकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं असं विधान करत या चर्चेवर शंका उपस्थित केली आहे. यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे.

मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो की…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रश्न विचारला असता शशिकांत शिंदे म्हणाले की, ‘अजित दादांचं निधन झालं नसतं तर ही चर्चा झाली की नाही हे सांगायची वेळ आली नसती. आमची बाजू अशी दाखवली जाते की आम्हीच ही चर्चा सुरू केली आणि दादा गेले त्यांच्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण मी अजित दादांची शपथ घेऊन सांगतो, माझं आणि त्यांचं भावनिक नातं आहे. त्यांची शपथ मी खोटी घेणार नाही. ही चर्चा 100 टक्के झाली होती, दोन्ही पक्ष एकत्र यावेत ही दादांची इच्छा होती. अजितदादा आणि पवार साहेबांची भेट झाली होती, त्यानंतर दादांनी पवार साहेबांच्या उपस्थितीत हा निर्णय घ्यायचा आहे.’

दहा बारा वेळा बैठका झाल्या

पुढे बोलताना शशिकांत शिंदे यांनी म्हटले की, ‘अजित दादांचे भविष्यकाळातील जे अंदाज होते, आराखडे होते यावर मी जास्त काही बोलणार नाही. मला वाटत की ज्यावेळी एखादा माणूस भाविनिकतेने बोलतो, मात्र तो व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या इच्छेसाठी आम्ही भूमिका मांडली, त्यानंतर आम्हालाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न होतो हे दुर्दैव आहे. विलीनीकरणाबाबत एकदा नाही दहा ते बारा वेळा बैठका झाल्या होत्या. तसं काही नसतं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आम्ही आमचे उमेदवार घड्याळ चिन्हावर कशाला उथे केले असते. ठरलं म्हणून केलं ना. महानगर पालिकांच्या निवडणुकीनंतर हा निर्णय होणार होता. मात्र लगेच जिल्हा परिषद आणी पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा झाली. मध्ये आठ दहा दिवसांचा वेळ मिळाला असता तर या चर्चेचा वेळ आला नसता. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर एकत्रि‍करणाचा निर्णय घ्यायचा हा निर्णय झाला होता.’



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : डोक्यावर प्रचंड कर्ज झालंय? मग करा कापराचे हे सोपे उपाय
  • Nashik | नाशिक पुन्हा हादरलं! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतर, प्रकरण इतकं गंभीर की…
  • Chanakya Niti : घरात सतत भांडणं होतात? पती पत्नीचं पटत नाही? मग चाणक्य यांचा हा सल्ला ऐकाच
  • Expressway मुळे आता 5 हिल स्टेशन्स आली अडीच ते चार तासांवर
  • GK : फक्त 30 मिनिटे झोपणारा प्राणी, उभं राहून मारतो डुलकी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in