• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अजितदादांचं बारामतीतच स्मारक होणार; शरद पवार आणि जय पवार यांच्यात दीड तास चर्चा

February 4, 2026 by admin Leave a Comment


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. अजितदादांचं अचानक जाणं सर्वांनाच चटका लावणारं ठरलं. अजितदादांच्या अपघाती मृत्यूमुळे पवार कुटुंबही हादरून गेलं आहे. अचानक झालेल्या या घटनेने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्यात ठिकठिकाणी अजितदादांच्या अस्थी विसर्जित केल्या जात असून शोकसभांचंही आयोजन करण्यात आलं आहे. आता अजितदादा यांचं स्मारक करण्यासाठी स्वत: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. बारामतीतच अजित पवार यांचं स्मारक साकारण्यासाठी आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजितदादा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आता त्याच ठिकाणी अजितदादांचं स्मारक तयार करण्यात येणरा आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये आज शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीला जय पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर जय पवार यांनी अंत्यविधी झालेल्या ठिकाणची पाहणीही केली आहे. अजितदादांच्या स्मारकाबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. जय पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत स्मारकाचा नकाशा पहात पाहणी केली आहे. त्यामुळे याच विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांचा स्मारक होणार हे निश्चित झालं आहे. मात्र या स्मारकाबाबत अद्याप कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कसं असेल स्मारक?

अजितदादांच्या स्मारकाची आराखडा कसा असेल? स्मारकात काय काय असेल याचं नियोजन केलं जाणार आहे. राज्यातील तरुणांना प्रेरणा ठरेल असं हे स्मारक बनवलं जाणार असून या स्मारकात अजितदादांच्या आठवणी जतन केल्या जाणार आहेत, अशी माहिती मिळतेय.

अजितदादांचा पुतळा उभारा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच अजितदादांच्या पुतळ्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे सेनेने पुणे महानगरपालिकेत अजितदादांचा पुतळा उभारावा यासाठी प्रस्ताव दिला आहे. शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी हा प्रस्ताव आयुक्तांकडे दिला आहे. अजित पवार यांचे मोठे योगदान पुणे शहरासाठी राहिलेलं आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना शहराच्या वतीने पक्ष कार्यालयात शोकसभाही आयोजित करण्यात आली होती. यावेळी हा प्रस्ताव मांडण्यात आला, अशी माहिती शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिली.

रिंग रोडला अजितदादांचं नाव द्या

दरम्यान, पुणे जिल्ह्यात होणाऱ्या नव्या रिंग रोडला अजित पवारांचे नाव द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांची केली आहे. पुण्याच्या भोवती होत असलेल्या रिंगरोडला अजित पवारांचे नाव देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुळशीतील शोकसभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी आपली भावना बोलून दाखवली. संबंधित प्राधिकरणांकडे प्रस्ताव मांडण्याची प्रक्रिया राबवण्याची तयारी सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुळशीतील घोटावडे फाटा येथे शोकसभेच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शोक व्यक्त करत पुण्यातील 13 तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या रिंग रोडला अजित पवार यांचे नाव द्यावं, अशी भावना मांडेकर यांनी व्यक्त केली. तसेच यासाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. अजित पवार यांच्या जाण्याने खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अजित पवार यांची विचार ज्योत कायमस्वरूपी स्मरणात ठेऊन, एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास करू, अशीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बीडमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारणार

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ बीड शहरात लवकरच पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी ही माहिती दिली. अजित पवार यांनी गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून अनेक विकासकामांना चालना दिली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यात विविध प्रकल्पांना गती मिळाली होती. दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली असून त्या देखील विकासाचा वारसा पुढे नेतील, असा विश्वास विजयसिंह पंडितांनी व्यक्त केला. अजित दादांच्या कार्याची आठवण कायम राहावी आणि त्यांच्या योगदानाला अभिवादन करण्यासाठी नगर परिषदेमार्फत हा पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आज राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांच्या अस्थिकलशाचे दर्शन त्यांनी यावेळी घेतले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकनाथ शिंदे यांच्या सभेला शिवसेनेतील मोठ्या नेत्याची दांडी, नाराजीची चर्चा
  • Pankaja Munde: तो एक निर्णय आणि पंकजा मुंडेंविरोधात गावकरी आक्रमक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे जाण्यास मज्जाव, घडलं तरी काय? 
  • ऐश्वर्या रायने रक्त सांडलं… शाहरुख खान दारू प्यायला… माधुरी दीक्षितबद्दल तर नको त्या अफवा… कोणालाच माहिती नसलेलं मोठं रहस्य
  • सर्वात मोठा सेल….या फोनवर मिळतेय प्रचंड सूट, फीचर्स आणि बॅटरी पाहून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
  • थंड चहा पिण्याचे शरीरावर काय होतात परिणाम? फायदे की हानी…, घ्या जाणून

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in