• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अचानक अति प्रमाणात केस गळू लागलेत? तर शरीरात लपलेला असू शकतो ‘या’ गंभीर समस्या

April 9, 2026 by admin Leave a Comment


आजकाल केस गळणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. दररोज 50 ते 100 केस गळणे सामान्य आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. कारण हजारो केसांपैकी 50-60 केस गळणे ही चिंतेची बाब नाही. परंतु जेव्हा केस गळणे अचानक वाढू लागते, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. काही लोकांना केसांमधून कंगवा फिरवताना केसांचा एक गुच्छा हातात येतो. पण बरेच लोकं याकडे केवळ हवामान, केसांची योग्य काळजी न घेणे किंवा तणावाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात. मात्र हे कधीकधी एखाद्या गंभीर आजार असलेल्या समस्येचे लक्षण असू शकते, म्हणून मूळ कारण लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग शरीरातील कोणत्या समस्येमुळे अति प्रमाणात केस गळू लागतात ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

हे खरे आहे की निरोगी केसांसाठी चांगले आरोग्य, योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक आहेत. मात्र कधीकधी आपल्या शरीरात एखादा आजार बळावतो, ज्यामुळे केस गळण्यासोबतच अंगदुखी आणि अशक्तपणा जाणवतो. ही वरवर किरकोळ वाटणारी लक्षणे एखाद्या गंभीर आजाराचे कारण असू शकतात, ज्याकडे अनेक लोकं सहसा दुर्लक्ष करतात.

थायरॉईडच्या समस्या हे कारण असू शकते

आजकाल थायरॉईडच्या समस्या ही एक सामान्य समस्या बनली आहे. बहुतेकजण मग ते पुरुष असोत वा स्त्रिया, थायरॉईडच्या आजाराने त्रस्त असतात. थायरॉईड ही मानेच्या पुढच्या भागात असलेली फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे, जी शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करण्यास मदत करते. जेव्हा तिच्या कार्यात बिघाड होतो, तेव्हा त्याचा परिणाम केसांवर होऊ शकतो. हायपोथायरॉईड आणि हायपरथायरॉईड या दोन्ही स्थितींमध्ये केस वेगाने गळू लागतात आणि कमकुवत होतात.

ॲलोपेशिया एरियाटा

ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून केसांच्या मुळांवर हल्ला करते, ज्यामुळे केस गळतात. या स्थितीमुळे स्कॅल्पवर टक्कल पडल्यासारखे दिसते. ॲलोपेशिया एरियाटामध्ये केस पूर्णपणे गळून पडतील की पुन्हा वाढतील हे निश्चितपणे ठरवणे अशक्य आहे. हे शरीरावर अवलंबून असते. कारण केस गळणे कधीही होऊ शकते किंवा एकदा वाढल्यानंतर ते पुन्हा वाढू शकतात.

ॲनिमिया (रक्ताची कमतरता)

ॲनिमिया ही समस्या विशेषतः लोहाची कमतरता असल्यावर निर्माण होते. मात्र ही समस्या केस गळण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वे केसांच्या मुळांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचू शकत नाहीत. शिवाय जेव्हा लोहाची कमतरता असते, तेव्हा शरीर केसांचे पोषण करण्याऐवजी हृदय आणि यकृतासारख्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करण्यासाठी लोहाचा वापर करते. यामुळे केसांच्या वाढीच्या चक्रात व्यत्यय येतो, ज्यामुळे केस वाढीचा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच गळून पडतात आणि तुटतात. ही समस्या विशेषतः महिलांमध्ये सामान्यपणे आढळते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दररोज एक ग्लास ‘हे’ पेय प्यायल्यास मुरुम आणि बद्धकोष्ठतेवर होईल मात, करून पहा रामबाण उपाय
  • बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनील तटकरे अजित पवारांचे नाव घेत म्हणाले…
  • Meesho ला तेजीचे पंख! 1 दिवसात 14 टक्क्यांनी उसळला शेअर, गुंतवणूकदारांचा मोठा फायदा
  • लग्नाच्या 11 वर्षांनंतर करण पटेलचा घटस्फोट? पत्नीने सोडलं मौन, म्हणाली “लग्नाच्या वेळी..”
  • Joint Family मध्ये राहिल्यामुळे तुमचे मन शांत होते का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in