• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर आनंदवार्ता धडकली, जयशंकर यांच्या कूटनीतिमुळे भारताचं टेन्शन मिटलं ! तेल टँकर…

March 12, 2026 by admin Leave a Comment


इराण वि. अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भयंकर युद्धाचा परिणाम जगाला सोसावा लागत आहे. गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाच्या झला संपूर्ण जगाला बसताना दिसत आहेत. तेलासाठी अनेक देशाता हाहा:कार माजला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी तर अक्षरश:युद्धभूमी बनली असून तिथे अनेक तेल टँकर वेगाने बुडवले जात आहेत. भारतातही यामुळे टेन्शनचं वातावरण होतं. मात्र या सर्वांमध्ये, भारताच्या बारकाईने केलेल्या राजनैतिक कूटनीतिमुळे अशक्य ते शक्य झालं असून त्यामुळे टेन्शन मिटलं आहे.

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध सुरू झाल्यानंतर, मृत्यूच्या दारातून सुटून भारतात पोहोचणारे हे पहिलंच जहाज असल्याने ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. अमेरिका आणि इस्रायलचे झेंडे असलेल्या तेलाच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही, असा इशारा इराणने दिला होता. त्याच पार्श्वभूीवर इराणकडून अनेक हल्ले करून काही टँकर बुडवण्यातही आले होते. मात्र असं असलं तरी सौदी अरेबियाहून मुंबईला लायबेरियाचा झेंडा अससेसा तेल टँकरचे मुंबईत झालेलं आगमन हा भारतासाठी एक मोठा राजनैतिक विजय मानला आहे.

जयशंकर आणि अराघची यांची डील

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सक्रिय राजनैतिक कूटनीतिमुळे आणि इराणी समकक्ष अब्बास अरघची यांच्याशी झालेल्या व्यापक चर्चेमुळे या मोहिमेला यश मिळालं आहे. चीन व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाच्या जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ देणार नाही अशी घोषणा इराणने केली होती, तेव्हाच जयशंकर यांनी पुढाकार घेत मोर्चा सांभाळला. मंगळवारी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्याशी फोनवरून दीर्घ चर्चा केली.

दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली आणि नियमित संपर्कात राहण्यावर सहमती दर्शविल्याचं जयशंकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केलं. भारतीय हितसंबंधांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी भारताने इराणसोबतची ऐतिहासिक मैत्री आणि धोरणात्मक स्वायत्तता उद्धृत केल्याचे सूत्रांनी सांगितलं. जागतिक ऊर्जा पुरवठ्याबाबत भारताची स्पष्ट भूमिका सुनिश्चित करण्यासाठी जयशंकर यांनी त्याच दिवशी जर्मनी आणि दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही चर्चा केल्याचीही माहिती समोर आली होती.

मुंबईत कधी पोहोचला तेल टँकर ?

दोन्ही नेत्यांतील चर्चेनंतर अखेर भारतासाठी आनंदवार्ता आली. तेलाचा हा मोठा टँकर बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास मुंबई बंदरात पोहोचला आणि संध्याकाळी 6 वाजता जवाहर बेटावर थांबला. जहाजावर 1,35,335 मेट्रिक टन कच्चे तेल आहे. हे कच्चे तेल मुंबईच्या माहुल रिफायनरीजमध्ये पाठवले जाईल. भारत, पाकिस्तान आणि फिलीपिन्समधील एकूण 29 क्रू मेंबर्स जहाजावर आहेत. जहाजातून सामान उतरवण्यास सुरुवात झाल्याची पुष्टी मुंबई बंदर प्राधिकरणाचे उपसंरक्षक प्रवीण सिंग यांनी केली असून यासाठी सुमारे 36 तासांचा कालावधी लागले, असं त्यांनी सांगितलं.

28 भारतीय जहाजे अजूनही रडारवर

मात्र “शेनलाँग” हे सुरक्षितपणे मुंबईत पोहोचलं असलं तरी, संकट अजून संपलेले नाही. शिपिंग महासंचालनालयाच्या नुसार, भारतीय ध्वजधारी 28 जहाजे युद्धक्षेत्राच्या परिसरात आहेत. राजनैतिक प्रयत्नांद्वारे, भारताने आतापर्यंत देश महिमा, स्वर्ण कमल आणि विश्व प्रेरणा यासह सात जहाजे अरबी समुद्रातील सुरक्षित पाण्यात हलवली आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nashik | नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन एन. चंद्रशेखर म्हणाले, गैरवर्तनाबाबत आम्ही…
  • 0..2..4..6 आणि 91! कर्णधार इशान किशनचा झंझावात, राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना झोडलं
  • SRH vs MI : अरे काय करतोय हा,अभिषेक झिरोवर आऊट होताच काव्या मारनचा संताप, पाहा व्हीडिओ
  • Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे हे 15 विचार वाचताच तुमचं अख्खं आयुष्य हमखास बदलेल, 5 वा विचार वाचून…
  • ‘माझं डोकं फिरलं…’ हार्दिक पांड्याचा निर्णय पाहून आर अश्विन वैतागला, या चुकीच्या निर्णयामुळे सामना गमावला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in