
अभिनेता अक्षय खन्ना गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. ‘छावा’ त्यानंतर ‘धुरंधर’ सिनेमात बजावलेल्या दमदार भूनिकेमुळे अभिनेत्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली आहे. आता चाहते अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या देखील प्रतिक्षेत आहे. सर्वत्र अक्षय खन्ना याची चर्चा सुरु असताना. अभिनेत्यासोबत एका महिला खासदाराने फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्या महिला खासदाराने अभिनेत्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून अभिनेत्री कंगना राणौत आहेत. सध्या कंगना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सांगायचं झालं तर, एकदा कंगना अभिनेते अनिल कपूर आणि अभिनेता संजय दत्त यांच्या सोबत दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण‘ शोमध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हा कंगना यांनी केलेल्या वक्तव्यावर अनिक आणि संजय देखील हैराण झाले. कंगना म्हणाल्या, अक्षयसोबत बोलण्याचा फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने कोणताच रिप्लाय दिला नाही…
शोमध्ये करण याने कंगना यांना विचारलं, ‘कधी कोणासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीकडून कोणतंच उत्तर आलं नाही…’ यावर कंगना म्हणाल्या, ‘अक्षय खन्ना… अक्षय याच्यासोबत मी बोलण्याचा आणि फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कधीच रिप्लाय दिला नाही… तो कधीच कोणासोबत बोलत नाही…’ असं देखील कंगना म्हणाल्या.
View this post on Instagram
त्यानंतर कंगना यांनी अनिल कपूर यांच्याकडे इशारा करत म्हणाल्या, ‘अक्षय, अनिल कपूर यांच्यासोबत बोलतो…’ यावर अनिल म्हणाले, ‘तो माझ्या लहान भावासारखा आहे…’, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे.
कंगना यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटींसोबत त्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यांच्यावर अनेकांचे संसार मोडल्याचे देखील आरोप आहे. अभिनेता आदित्य पंचोली, हृतिक रोशन आणि अजय देवगण यांच्यासोबत देखील कंगना यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. स्वतः कंगना यांनी स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत.
आदित्य पंचोली आणि कंगना राणैत लग्न झालेलं नसताना पती – पत्नी प्रमाणे राहत होते… असं देखील अनेकदा समोर आलं आहे. एवढंच नाही तर. अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटासाठी देखील कंगना कारणीभूत आहेत… असं देखील सांगण्यात आलं. अनेक सेलिब्रिटींसोबत कंगना यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आजही कंगना अविवाहित आहेत.
Leave a Reply