• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा, विरारचा उल्लखे करत म्हणाले…

February 6, 2026 by admin Leave a Comment

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारताने  कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात जिंकली. भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमवून 411 धावा केल्या. तसेच विजयासाठी 412 धावांचं आव्हान दिलं. पण इंग्लंडचा संघ 311 धावा करू शकला. भारताने हा सामना 100 धावांनी जिंकला आणि इतिहास रचला. भारताने सहाव्यांदा अंडर 19 वनडे वर्ल्डकपला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली. भारताने एकही सामना गमावला नाही. अंतिम फेरीत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयानंतर भारतात विजयोत्सव साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीम इंडियाचं कौतुक केलं.  मुख्यमंत्र्यांनी संघाचं कौतुक करताना विरारचा उल्लेख केला. त्याला कारणंही तसंच आहे. कर्णधार आयुष म्हात्रे हा विरारचा असल्याने त्यांनी हा उल्लेख केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत लिहिलं की, ‘विरार आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! आयसीसी अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन. विरारचा आपलाच मुलगा आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली या संघाने धैर्य, शिस्त आणि अढळ दृढनिश्चय दाखवला. अंतिम सामन्यात 175 (80) धावांची उत्कृष्ट खेळी केल्याबद्दल वैभव सूर्यवंशीचा विशेष अभिनंदन, ही कामगिरी या विजयाचा एक निर्णायक क्षण म्हणून लक्षात ठेवली जाईल. आपल्या तरुणांनी केवळ ट्रॉफीच जिंकली नाही तर देशाची मनेही जिंकली आहेत!’

Historic Moment for Indian Cricket! 🇮🇳
Proud moment for Virar and Maharashtra!

Heartiest congratulations to Team India on lifting the ICC U19 Men’s Cricket World Cup 2026.
Under the captaincy of Ayush Mhatre, our very own boy from Virar, this team showcased grit, discipline, and… pic.twitter.com/O3iFygwzzM

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 6, 2026

कर्णधार आयुष म्हात्रे विजयानंतर म्हणाला की, ‘मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही, पण क्रिकेटच्या प्रवासात आमच्यासाठी हा एक संस्मरणीय क्षण आहे. मुलांनी खूप चांगले खेळले आहे आणि आम्ही जे ध्येय ठेवले होते ते त्यांनी खूप चांगले केले. ते एक नैसर्गिक खेळ म्हणून खेळले. तर, हो, मी खरोखर आनंदी आहे. सूर्यवंशी फक्त ते करत राहतो. त्याच्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत, त्याने किती खेळ केला. पण हो, आम्हाला माहित आहे की तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. म्हणून त्याने या सामन्यात तो काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. आम्हाला आनंद आहे की रोहित शर्मानेही विश्वचषक जिंकला आहे, हरमनप्रीतनेही आणि आता आम्ही तो वारसा पुढे नेत आहोत. म्हणून आम्हाला आनंद आहे की आम्ही वारसा पुढे नेत आहोत.’

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • इराण संघर्षात सौदीने वाढवले गॅसचे दर, भारत आणि चीन यांनी बदलली रणनिती
  • इराणने जिरवली! जखमी अमेरिकन सैनिकांनी सांगितलं असं सत्य की… डोनाल्ड ट्रम्प यांना जबर हादरा
  • मद्यपानापूर्वी दारूचे दोन थेंब जमिनीवर का शिंपडतात? अट्टल बेवड्यालाही माहिती नसेल खरं कारण
  • 6 मिनिट 9 सेकंदाचं गाणं, ज्याने लोकांना आणलं होतं अडचणीत, देशभरात अनेकांना झाली होती अटक
  • …म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in