
क्रिकेट विश्वात 2025 वर्षात अनेक घडामोडी झाल्या. अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर काहींनी निवृत्ती घेत क्रिकेटला कायमचा अलविदा केला. युवा खेळाडूंनी आपली छाप सोडत अनेक विक्रम मोडीत काढले. तर काहींना संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. काही खेळाडूंनी खरंच उल्लेखनीय कामगिरी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. तर काहींना धावांसाठी आणि विकेटसाठी संघर्ष करावा लागला. तर काही फलंदाज सपशेल अपयशी ठरले. या निमित्ताने 2025 वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या 5 फलंदाजांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
सॅम अय्यूब पहिल्या स्थानी
पाकिस्तानचा युवा फलंदाज सॅम अय्युब 2025 वर्षात सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट झाला. सॅम कसोटी, एकदिवसीय आणि टी 20I या तिन्ही प्रकारात एकूण 8 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. सॅम 2025 वर्षातील 37 पैकी 8 डावांत झिरोवर आऊट झाला. तर उर्वरित 29 डावांत त्याने 817 धावा केल्या.
रॉस्टन चेज
वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर रॉस्टन चेज हा यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रॉस्टन तिन्ही फॉर्मेटमधील 44 पैकी 7 डावात शून्यावर बादा झाला.
शाहीन आफ्रिदी तिसऱ्या स्थानी
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. शाहीन तिन्ही प्रकारातील 23 डावांत एकूण 6 वेळा आला तसाच परत गेला. शाहीनने 11.2 च्या सरासरीने एकूण 168 धावा केल्या.
जेडन सील्स चौथ्या स्थानी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2025 या वर्षात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा जेडन सील्स हा चौथ्या स्थानी आहे. जेडन या वर्षात 6 वेळा झिरोवर आऊट झाला आहे. जेडनने 11.13 च्या सरासरीने 167 धावा केल्या आहेत.
शेरफन रुदरफोर्ड
वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर शेरफन रुदरफोर्ड 2025 वर्षात 25 डावांतून तब्बल 6 वेळा शून्यावर बाद झाला. शेरफेनचा या यादीत पाचवा क्रमांक आहे. शेरफन याने 16.2 च्या सरासरीने 406 धावा केल्या.
Leave a Reply