
टीम इंडियासाठी आणि क्रिकेट विश्वासाठी 2025 हे वर्ष खास ठरलं. क्रिकेट चाहत्यांना टेस्ट वनडे, आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनेक थरारक सामने पाहायला मिळाले. अनेक फलंदाजांनी या वर्षात अनेक विक्रम केले. या निमित्ताने 2025 वर्षात कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)
ऑस्ट्रियाच्या करनबीर सिंह याने टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक 122 षटकार लगावले आहेत. मात्र फुल मेंबर्स टीमचा विचार करता टी 20i क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा हा विक्रम हा भारताच्या अभिषेक शर्मा याच्या नावावर आहे. अभिषेकने या वर्षात 54 टी 20i षटकार लगावले आहेत. (Photo Credit : PTI)
रोहित शर्मा याच्या नावावर 2025 या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. रोहितने या वर्षात 24 षटकार खेचले आहेत. तर एकूण पाहता (फुल नेशन टीम्स) हा विक्रम स्कॉटलँडच्या जॉर्ज मुन्से (34 षटकार) याच्या नावावर आहे. (Photo Credit : PTI)
कसोटी क्रिकेटमध्ये 2025 या वर्षात सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा ऋषभ पंत याच्या नावावर आहे. पंतने 7 सामन्यांमध्ये तब्बल 26 षटकार लगावले. तर शुबमन गिल याच्या नावावर 15 षटकारांची नोंद आहे. (Photo Credit : PTI)
एकूणच ही आकडेवारी पाहता भारतीय फलंदाजांचा कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i फॉर्मेटमध्ये दबदबा असल्याचं स्पष्ट होतं. आता येणारं वर्ष ही भारतीय फलंदाजांसाठी असंच जावोत, अशीच आशा चाहत्यांना असणार आहे. (Photo Credit : PTI)




Leave a Reply