
ग्लोबल मार्केटमध्ये रोज नवनवीन स्मार्टफोन लॉंच होत असतात. त्यातच शाओमी कंपनीने देखील त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Xiaomi 15 Ultra चे अपग्रेडेड व्हर्जन Xiaomi 17 Ultra ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत हे नवीन मॉडेल अपग्रेडेड बॅटरी, प्रोसेसर आणि कॅमेरासह येते. वैशिष्ट्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर Xiaomi 17 Ultra क्वालकॉमच्या फ्लॅगशिप ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. हा फोन 200-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा सेन्सरने सुसज्ज आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि खास वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
Xiaomi 17 Ultra ची फिचर्स
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.9-इंचाचा 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले आहे जो 120 Hz रिफ्रेश रेट आणि 1060 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा हँडसेट क्वालकॉम 3nm स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर आणि अॅड्रेनो 840 GPU ने सुसज्ज आहे.
कॅमेरा सेटअप: हँडसेटमध्ये Leica-ट्यून केलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल LOFIC Omnivision 1050L प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सेल Samsung JN5 अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आहे. समोर 50-मेगापिक्सेल OV50M कॅमेरा आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 6800mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 90W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Xiaomi 17 Ultra ची किंमत
Xiaomi च्या या फोनची किंमत 12GB/512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी CNY 6,999 चिनी युआन अंदाजे भारतीय चलनानुसार 90 हजार रुपये आहे. तर 16GB RAM/512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी CNY 7,499 रूपये अंदाजे 96 हजार रुपये आणि 16GB/1TB व्हेरिएंटसाठी CNY 8,499 युआन अंदाजे 1 लाख 9 हजार रुपये इतकी किंमत आहे. दुसरीकडे, Xiaomi १७ अल्ट्रा लाइका एडिशनची किंमत 16GB/512GB व्हेरिएंटसाठी CNY 7,999 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 1 लाख 2 हजार रुपये आणि16GB/1TB व्हेरिएंटसाठी CNY 8,999 अंदाजे 1 लाख 15 हजार रुपये आहे.
जर हा फोन भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी या किमतीत लाँच केला गेला, तर हा शाओमी ब्रँड फोन Samsung Galaxy Z Flip6 5G, Samsung Galaxy Z Fold5, OPPO Find X8 Pro 5G आणि iPhone 17 सारख्या स्मार्टफोन्सना कडक स्पर्धा देईल.
Leave a Reply