
श्रीलंका वूमन्स टीमचे फलंदाज सलग दुसऱ्या टी 20i सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर ढेर झाले आहेत. श्रीलंका टीमला दुसऱ्या सामन्यातही 130 पार मजल मारता आली नाही. भारताने श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 9 झटके देऊन 128 रन्सवर रोखलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला सलग दुसऱ्या विजयासाठी अवघ्या 129 धावांची गरज आहे. श्रीलंकेने 2 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फार यश आलं नाही. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी झटपट झटके दिले. त्यामुळे श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर ज्यांना सुरुवात मिळाली त्यांनाही श्रीलंकेला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवता आलं नाही. त्यामुळे आता टीम इंडिया हे आव्हान किती षटकांत पूर्ण करते? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
Leave a Reply