
टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडू हे विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहेत. टीम इंडिया अवघ्या काही दिवसांनी मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध भिडणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वनडे आणि टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याआधी रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, इशान किशन यासारखे अनेक स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका करत आहेत. विराट कोहली या स्पर्धेत दिल्लीचं प्रतिनिधित्व करत आहेत. विराटने या स्पर्धेतील पहिल्या 2 सामन्यात धमाका केला. विराटने पहिल्या सामन्यात शतक आणि त्यानंतर अर्धशतक झळकावलं. विराटने अशाप्रकारे एकूण 208 धावा केल्या आहेत. मात्र आता मोठी अपडेट समोर आली आहे.
विराटने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेदरम्यान मोठा निर्णय घेतला आहे. विराटने दिल्ली टीमची साथ सोडली आहे. विराट दिल्लीची साथ सोडून घरी परतला आहे. विराट आता या स्पर्धेत दिल्लीकडून उर्वरित 3 सामने खेळणार नसल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट बंगळुरु विमानतळावरुन घरासाठी रवाना झाला आहे. विराट कुटुंबियांसह नववर्षांचा जल्लोष करण्यासाठी निघालाय.
Leave a Reply