
नागपूर हिवाळी अधिवेशनात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीतील गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या मालाला ९ टक्के आर्द्रता असूनही तो रिजेक्ट केला जात असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन केवळ गोदाम स्तरावर नाकारले जात असल्यामुळे खरेदी केंद्रे माल घेणे बंद करत आहेत. या गंभीर परिस्थितीत, वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक आरोप केला. बीड येथील अखिल नावाचा एक खाजगी व्यक्ती प्रत्येक सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर करण्यासाठी चार लाख रुपये घेत असल्याचा दावा त्यांनी केला. या व्यक्तीकडून ओएसडी अभिजीत पाटील आणि गर्जे यांच्या नावाचा वापर केला जात असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. १२ पैकी ५० टक्के केंद्रांवरून पैसे वसूल केल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.
Leave a Reply