
तुमच्यापैकी अनेकजण हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबले असतील. अनेकदा ग्राहक खराब रूमची तक्रार करत असतात. अशातच आता चीनमधील चांगचुन शहरातून एक बातमी समोर आली आहे. एका ई-स्पोर्ट्स हॉटेलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने तब्बल 2 वर्षांनी रूम सोडली. त्याने चेकआउट करताच हॉटेल कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. कारण त्या व्यक्तीची रूम कचऱ्याने भरलेली होती. या रूमचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हॉटेलच्या खोलीत काय होते?
2 वर्षे रूममध्ये राहिल्यानंतर या व्यक्तीने चेक आऊट केले. तो बाहेर पडताच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाचा उघडला, त्यानंतर सर्वांना धक्का बसला. कारण त्यांना आतमध्ये कचऱ्याचे ढीग आढळले. काही ठिकाणी कचरा जवळजवळ एक मीटर उंच होता. या व्यक्तीने दोन वर्षांच्या काळात एकदाही हाऊसकीपिंग स्टाफला साफसफाईसाठी बोलावले नव्हते. या व्यक्तीच्या रूममधून टेकवे बॉक्स, फूड रॅपर्स, प्लास्टिक पिशव्या आणि रिकाम्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
कर्मचारी हैराण
हॉटेलमध्ये राहणारे अनेक लोक रूम खराब करत असतात, मात्र या व्यक्तीने तर हद्द पार केली. कारण रूमध्ये कचऱ्याचा थर पसरलेला होता. प्रत्येक कोपऱ्यात प्लास्टिक होते. ई-स्पोर्ट्सचे महागडे गेमिंग डेस्क आणि खुर्च्या देखील कचऱ्यात पुरलेल्या होत्या. ही खोली कचऱ्याच्या ढिगाऱ्यासारखी दिसत होती. या रूमच्या टॉयलेट सीट भोवती वापरलेले टॉयलेट पेपर पसरलेले होते. तसेच आतमध्ये घाण साचलेली होती. हे दृष्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक होते.
Man checks out from a hotel in China after two years
This is how the hotel room was found…pic.twitter.com/BwZHjx5Jtg
— Defiant L’s (@DefiantLs) December 18, 2025
हा व्यक्ती कोण होता?
हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, हा व्यक्ती कधीही बाहेर पडला नाही. अनेकांनी त्याला कधीही पाहिलेले नाही. तो सतत गेम खेळत असायचा. तो डिलिव्हरी द्वारे अन्न मागवायचा आणि तो कचरा थेट जमिनीवर फेकायचा, त्यामुळे रूमध्ये कचऱ्याचे थर जमा झाले होते.
ई-स्पोर्ट्स हॉटेल्स म्हणजे काय?
चीनमधील ई-स्पोर्ट्स हॉटेल्स ही गेमर्ससाठी डिझाइन केलेली . यात हाय क्वालिटीटे संगणक, आरामदायी खुर्च्या, मोठे मॉनिटर आणि फास्ट इंटरनेट असते. या हॉटेलमध्ये अल्पकाळासाठी किंवा दीर्घकाळासाठी मुक्काम करता येतो. हा व्यक्ती निघून गेल्यानंतर हॉटेल मालकाने स्वच्छता पथकाला बोलावले. या पथकाने तब्बल तीन दिवस साफसफाई केली. मात्र तरीही ही रूम अजूनही राहण्यायोग्य नाही आणि त्याची संपूर्ण दुरुस्ती करावी लागेल अशी माहिती हॉटेल व्यवस्थापनाने दिली आहे.
Leave a Reply