• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video: कारभारीण कामाला लागली; सूरज चव्हाणच्या बायोकाचा लग्नानंतर खास Video Viral

December 3, 2025 by admin Leave a Comment


‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा ‘गुलिगत किंग’ सूरज चव्हाण आणि त्याची लहानपणाची मैत्रीण संजना लग्नाबंधनात अडकले आहेत. सूरज आणि संजना गोफणे यांचा 29 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत दणक्यात विवाह झाला. हजारो चाहते, 50 बॉडीगार्ड्सचा पहारा, सोशल मीडियावर ट्रेंडिंग फोटो-व्हिडीओ… सूरज-संजनाच्या लग्नानं महाराष्ट्राला खरंच वेड लावलं होतं. पण लग्नाला अवघे तीन दिवस उलटत नाहीत तोच सूरजची नववधू संजना गोफणे-चव्हाणनं ‘सुगरण’ अवतार दाखवला आणि नेटकऱ्यांना प्रेमात पाडलं आहे.

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी स्वयंपाकघरात

सोशल मीडियावर सध्या संजनाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती हसत कोथिंबीर निवडताना दिसत आहे. पारंपरिक साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहून चाहते खूश झाले आहेत. अनेकांनी संजनाच्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने, “अगं लग्नाला तीनच दिवस झाले, आणि बायको आधीच कारभारीण झाली” असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, “सूरजला घरचं जेवण फार आवडतं, आता संजनानं त्याची प्लेट भरून देणार!” असे म्हटले आहे.

Video: काय प्रकार आहे हा?; लग्नाच्या रिसेप्शनला नंदिवरुन एण्ट्री केल्यामुळे प्राजक्ता गायकवाड चांगलीच ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by 🚩 shraddha (नाईक)👑 (@shra_ddhamakar)

खरंच सूरजला नॉन-व्हेजपेक्षा जास्त व्हेज आवडतं आणि घरचं जेवण तर त्याचा जीव की प्राण आहे. आता संजनानं त्याची ही आवड पूर्ण करायला सुरुवात केली आहे आणि चाहत्यांना ही ‘लव्हस्टोरी पार्ट-२’ खूपच आवडत आहे.

बालपणीची मैत्री → प्रेम → लग्न!

सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणीपासून ओळखतात. संजना ही सूरजच्या मामाची मुलगी. दोघेही एकत्र खेळले, मोठे झाले, प्रेमात पडले आणि घरच्यांनीही लगेच होकार दिला. म्हणजे अगदी फिल्मी लव्हस्टोरी. लग्नानंतर सूरजनं चाहत्यांसमोर हसत हसत सांगितलं होतं, “आता लगेच हनिमूनला महाबळेश्वरला जाणार आणि मला लवकरच दोन मुलं हवीत.” आता संजनानं स्वयंपाकघरात एण्ट्री घेतलीय, तर चाहते म्हणतायत, “सूरज भावा, आता तुझी प्लेट आणि पोट दोन्ही फुल्ल भरलेलं राहणार!” सध्या सगळीकडे संजनाच्या या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे…लाडक्या बहिणींच्या पैशांचे…आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, शिंदेंना डिवचलं!
  • Aaditya Thackeray : फेकनाथ मिंधे…लाडक्या बहिणींच्या पैशांचे…आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, शिंदेंना डिवचलं!
  • “मला दुसरं लग्न करायचंय पण..”, महिमा चौधरीने सांगितली तिची सर्वांत मोठी अडचण
  • ‘या’ राशींच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये, नियम जाणून घ्या
  • CM Fadnavis: फडणवीस यांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले, जास्तीत जास्त…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in