
हिंदू धर्माशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.हिंदू धर्मशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रात केलेल्या मार्गदर्शनानुसार नसते तेव्हा तुमच्या घरावर अनेक संकटं येऊ शकतात. जसं की वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे की, तुमच्या घराचा मुख्य दरवाजाचं तोंड हे दक्षिण दिशेला असू नये, ते पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच असावं. मात्र जर तुमच्या घराचं तोंड हे दक्षिण दिशेला असेल तर तुम्हाला कायम आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल, एवढंच नाही तर त्यामुळे तुमच्या घरात कायम नकारात्मक ऊर्जा राहाते, त्याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊन तुम्हाला आर्थिक अडचणी जाणवतात. जर तुम्हाला कायमच आर्थिक अडचणी येत असतील तर काय करावं? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत.
या दिवशी करा आर्थिक व्यवहार – वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातील असे काही विशिष्ट वार असतात, ज्या दिवशी तुम्ही जर आर्थिक व्यवहार केले तर त्या आर्थिक व्यवहारांमध्ये तुम्हाला फायदा होतो, घराची भरभराट होते, आर्थिक स्थैर्य लाभतं. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो. वास्तुशास्त्रानुसार सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार हे आठवड्यातील तीन असे दिवस आहे, ज्या दिवशी कोणताही आर्थिक व्यवहार करणं शुभ मानलं जातं. या दिवशी तुम्ही कोणाला उसणे पैसे देऊ शकता, कोणाकडून पैसे घेऊ शकता. मात्र शनिवारी कोणताही आर्थिक व्यवहार करणं टाळावं,असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.
तसेच घरातील धनाची वृद्धी करण्यासाठी आणखी एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या घरात नेहमी उत्तर दिशेला कुबेराची प्रतिमा लावावी. कुबेराला धनाची देवता म्हटलं जातं, आणि उत्तर दिशा ही कुबेराची आवडती दिशा आहे. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला कुबेराची प्रतिमा लावल्यास त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. तसेच तुमच्या देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो ठेवावा, आणि दररोज लक्ष्मी मातेची पूजा करावी, यामुळे घरात कधीही धनाची कमी भासत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Leave a Reply