• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : जर तुम्हालाही भीतीदायक स्वप्न पडत असतील, तर झोपण्यापूर्वी हा उपाय नक्की करा

December 18, 2025 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्र हे प्रामुख्यानं सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन गोष्टींवर कार्य करते, जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. तुम्ही कितीही पैसा कमाववा तरी तो हातात टिकत नाही, तुमच्यावर असलेलं कर्ज वाढतच जातं, एवढंच नाही तर जर घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तुम्हाला अनेकदा नकारात्मक किंवा भीतीदायक स्वप्न पण पडू शकतात, सामान्यपणे तुम्ही दिवसभर जे अनुभवता, जे पहाता ते रात्री तुमच्या स्वप्नात दिसतं असं मानलं जातं, मात्र काही स्वप्न अशी देखील असतात, ती स्वप्न तुम्हाला काही विशिष्ट संकेत देण्यासाठी पडतात, अशा स्वप्नाचा आणि वास्तुशास्त्राचा जवळचा संबंध असतो. भीतीदायक स्वप्न पडू नये, यासाठी काय करावं? याची माहिती वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहे.

दिशा – झोपताना कधीच दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये, वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते. आपल्या पूर्वजांची दिशा मानला जाते, त्यामुळे कधीही या दिशेला पाय करून झोपू नये, दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तर दिशेला पाय करून झोपावं, ज्या प्रमाणे दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये, त्याचप्रमाणे पूर्व दिशेला पाय आणि पश्चिम दिशेला डोकं करून झोपू नये. नेहमी पूर्व पश्चिम असं झोपावं, यामुळे भीतीदायक स्वप्न पडत नाहीत, तसेच आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

मिठाची पुडी – झोपताना तुम्ही जर तुमच्या उशिखाली मिठाची पुडी ठेवली तरी देखील तुम्हाला जी वाईट स्वप्न पडतात ती पडत नाहीत, सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तिपासून तुमचं संरक्षण होतं असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, झोपताना आपल्या इष्ट देवतेचा जप केल्यास देखील शांत झोप लागते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Uddhav Thackeray : ही शेवटची निवडणूक… उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर भाजपच्या बड्या नेत्याचं मोठं विधान
  • Mira Bhayandar Leopard : मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, तळ्याजवळच्या इमारतीत एन्ट्री अन्… थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
  • Dhurandhar Records in 14 Days: रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ची मोठी कमाल! रिलीजच्या १४ दिवसांत एक-दोन नव्हे तर २५ रेकॉर्ड बनवले
  • Bangladesh Violence : भारताचा गेम करण्यासाठी ISI ने बांग्लादेशात मोठं कांड घडवलं का?
  • BMC Election 2026 : मुंबईत भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना यांची युती होणार का? संजय शिरसाट यांच्याकडून महत्वाची अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in