
Urmila Matondkar Life : एक काळ बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्मिला हिचं सौंदर्य, डान्स आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबत अभिनेत्रीच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं… त्यानंतर उर्मिला हिच्या नावाने सिनेमे बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमावू लागले… अनेक सिनेमांमध्ये उर्मिला हिने दमदार भुमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं… पण ‘रंगीला’ सिनेमामुळे उर्मिला हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली.
‘रंगीला’ सिनेमामुळे उर्मिला एका रात्रीत स्टार झाली… 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’ सिनेमाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं. सिनेमामुळे राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यशाच्या शिखरावर पोहोचले. त्यानंतर उर्मिला हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही, ‘सत्या’, ‘पिंजर’, ‘जुदाई’ आणि ‘कौन’ अशा अनेक सिनेमांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
यश मिळाल्यानंतर राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं… दरम्यान, दोघांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चांनी देखील जोर धरला… वर्मा यांची उर्मिला हिच्यावर इतका जिव जडला होता की, त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला…
रिपोर्टनुसार, राम गोपाल वर्मा आणि उर्मिल मातोंडकर यांच्या अफेअरच्या दिग्दर्शकाच्या पत्नीपर्यंत पोहोचल्या… तेव्हा संतापलेल्या पत्नीने अभिनेत्रीच्या सणसणीत कानाखाली मारली… ज्यामुळे राम गोपाल वर्मा यांचा घटस्फोट झाला असं देखील सांगितलं जातं… त्यानंतर उर्मिला आणि वर्मा कधीच एकत्र दिसले नाही. शिवाय अभिनेत्री यावर कधी व्यक्त देखील झाली नाही.
राम गोपाल वर्मा सकाळी का पाहातात अडल्ट कॉन्टेंट?
अडल्ट कॉन्टेंट बद्दल खुद्द वर्मा यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ‘रात्री 2 किंवा 3 वाजता झोपायला गेला तरी सकाळी 6 वाजण्यापूर्वी उठतो. सकाळी उठल्या – उठल्या 10 किंवा 15 मिनिटं अडल्ट कॉन्टेंट पाहतो… सकाळी लवकर मिनिटं अडल्ट कॉन्टेंट पाहण्याचं कारण देखील सांगितलं होतं, शरीरातील रासायनिक अभिक्रियेमुळे ऊर्जा दिवसभर टिकून राहते… असं दिग्दर्शक म्हणलेला…
Leave a Reply