
UPI ने कॅशलेस ट्राक्झंशनला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवले आहे.भाजी खरेदी पासून ते मोठ्या खरेदीपर्यंत सर्व व्यवहार मोबाईलने झटपट होत आहेत. परंतू गेल्या काही काळात युपीआयच्या फ्रॉडच्या घटनाही समोर आल्या आहेत. ज्यात लोकांच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहेत.
आर्थिक सल्लागाराच्या मते युपीआय खात्याला सेव्हींग खात्यापासून वेगळे ठेवणे सर्वात सुरक्षित असते. ज्या बँक खात्याशी युपीआय लिंक असेल त्यात मर्यादित रक्कमच ठेवावी. यामुळे कोणत्याही अशा घटनेत कमी नुकसान होईल.
या शिवाय बहुतांशी बँक आणि पेमेंट्स एप्समध्ये देवाण घेवाण याची मर्यादा सेट करण्याचा पर्याय मिळतो. एकदा लिमिट सेट केली की फ्रॉडच्या स्थितीत संपूर्ण बँक बॅलन्स साफ होण्याचा धोका राहात नाही.
UPI चा जास्त स्पीड कधी कधी युजर्सना चुक करण्यास भाग पाडतो. त्यामुळे पेमेंट करताना रिसिव्हरचे नाव जरुर जाणून घ्यावे आणि QR स्कॅन करताना स्क्रीनवर दिसणारी माहिती काळजी पूर्वक वाचावी. घाईघाईत केलेले पेमेंट भारी पडू शकते.
कुटुंबातील अन्य सदस्य, खासकरुन ज्येष्ठांना डिजिटल फ्रॉड संदर्भात जागरुक करणे गरजेचे असते. त्यांच्या फोनमध्ये कमी लिमिट सेट करा आणि स्पष्ट सांगावे की नीट तपास केल्याशिवाय पेमेंट रिक्वेस्टला स्वीकारु नये.
तसेच आपला UPI PIN कोणालाही सांगू नये. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करु नये. अनोखळी वेबसाईट वा मॅसेजवर येणाऱ्या लिंक मालवेअरचे कारण बनू शकते. त्यामुळे संपूर्ण फायनान्शियल डेटा अडचणीत सापडू शकतो.





Leave a Reply