
अंडर 19 आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तान संघासाठी पंतप्रधानांनी बक्षिस देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यानुसार प्रत्येक खेळाडूला 1 कोटी पीकेआर रुपये देण्यात येणार आहेत. (Photo Credit : ACC)
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी 22 डिसेंबरला अंडर 19 आशिया कप विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये देणार असल्याचं जाहीर केलं. (Photo Credit : ACC)
पाकिस्तानने रविवारी 21 डिसेंबरला अंतिम सामन्यात टीम इंडियावर एकतर्फी विजय मिळवला. त्यानंतर या विजेत्या संघाचं आणि सपोर्ट स्टाफचं इस्लामाबादमध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळेस बक्षिस देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. (Photo Credit : ACC)
पंतप्रधान प्रत्येक खेळाडूला 1 कोटी पाकिस्तान रुपये देण्यात येणार असल्याची माहिती मेंटॉर सरफराज अहमद याने दिली. त्याआधी मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी आशिया कप विजेत्या संघाच्या खेळाडूला प्रत्येकी 50 लाख रुपये देणार असल्याचं जाहीर केलं होतं. (Photo Credit : ACC)
समीर मिन्हास हा पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. समीरने अंतिम सामन्यात 113 चेंडूत 172 धावांची खेळी केली. समीरने या खेळीत 9 षटकार आणि 17 चौकार लगावले होते. (Photo Credit -X)




Leave a Reply