
मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन याबाबत पुढाकार घेतला. मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागा असून, सूत्रांनुसार मनसेला यापैकी ७५ ते ८० जागांची अपेक्षा आहे. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक जागा, तर मराठी बहुल भागात दोन ते तीन जागा मिळाव्यात अशी मनसेची मागणी आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना (अविभाजित) ८४, भाजप ८२ आणि मनसे ७ जागांवर विजयी झाली होती. त्यावेळी मनसेचे निवडून आलेले नगरसेवक सध्या राज ठाकरे यांच्यासोबत नाहीत. आता राजकीय समीकरणे बदलली असून, ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात ते मैदानात उतरणार आहेत. निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी, जागावाटपाची तयारी ठाकरे बंधूंनी सुरू केल्याचे दिसते.
Leave a Reply