• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Test Cricket : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या विजयासह WTC Points Table धमाका, इंग्लंडची वाईट स्थिती, टीम इंडिया कितव्या स्थानी?

December 7, 2025 by admin Leave a Comment


ऑस्ट्रेलियाने मायदेशात सुरु असलेल्या एशेस सीरिजमध्ये आपला दबदबा कायम राखत इंग्लंडचा सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमधील द गाबातील डे-नाईट टेस्टमध्ये चौथ्या दिवशी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने यासह मालिका जिंकण्याचा दावा आणखी मजबूत केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाला या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये (WTC 2025-2027 Points Table) आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. तर या पराभवामुळे इंग्लंडची वाईट स्थिती झाली आहे. या सलगच्या 2 पराभवांमुळे इंग्लंडचं अंतिम फेरीत पोहचणं अवघड झालं आहे. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कितव्या स्थानी आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंडने या ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 65 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान फक्त 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाची या मालिकेत 8 विकेट्सने सामना जिंकण्याची सलग दुसरी वेळ ठरली.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती काय?

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत आतापर्यंत अजिंक्य आहे. ऑस्ट्रेलियाने या साखळीत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 60 पॉइंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 100 टक्के इतकी आहे. या साखळीतील एका विजयासाठी 12 पॉइंटसची तरतूद आहे.

दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी

गतविजेता दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने एकमेव सामना गमावला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 36 पॉइंट्स आहेत. तर दक्षिण आफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 75 इतकी आहे. तर टीम इंडिया पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या निकालाचा परिणाम टीम इंडियावर झाला नाही.

टीम इंडियाची कामगिरी कशी ?

टीम इंडियाने या साखळीत आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. भारताला 9 पैकी 4 सामन्यांमध्ये विजयी होता आलं आहे. तर 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 1 सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे टीम इंडियाच्या खात्यात 52 पॉइंट्स आहेत. तर टीम इंडियाची विजयी टक्केवारी 48.15 इतकी आहे. पॉइंट्स टेबलमधील अव्वल 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी कायम

Australia’s perfect #WTC27 record remains intact 👏

Full standings 📲 https://t.co/TJt9cbipMe pic.twitter.com/XH4R9TuduG

— ICC (@ICC) December 7, 2025

इंग्लंडची फायनल वारी अवघड!

दरम्यान इंग्लंडच्या सुमार कामगिरीमुळे ते सातव्या स्थानी आहेत. त्यामुळे इंग्लंडची फायनल वारी अवघड असल्याचं समजलं जात आहे. इंग्लंडने या साखळीत 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. इंग्लंडच्या खात्यात 26 पॉइंट्स आहेत. तर विजयी टक्केवारी ही 30.95 अशी आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video: अनुष्काच्या डोळ्यात पाणी, विराटने जोडले हात… प्रेमानंद महाराजांच्या मठात नेमकं काय घडलं?
  • हे प्रचंड संतापजनक… या मुख्यमंत्र्यांनी मंचावर ओढला महिलेचा बुरखा… Video समोर येताच संतापाची लाट
  • Ambani Family : एकेकाळी झाडू – फरशी पुसणारा ‘तो’ अंबानी कुटुंबियांमुळे झालाय मालामाल, पण कसं?
  • Mumbai BMC Election: जे हिंदुत्वाचे नाही झाले.. ते मराठी माणसाचे… ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या ‘त्या’ बॅनरची तुफान चर्चा
  • IPL Auction 2026 Live: अबुधाबीत मिनी ऑक्शनचा थरार, 369 पैकी 77 खेळाडूच ठरणार सोल्ड

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in