• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tere Ishq Mein: ‘रांझना’ बनवायला गेले पण..; धनुष-क्रितीच्या सिनेमातील 5 मोठ्या चुका, तरी बॉक्स ऑफिसवर होतोय हिट

December 2, 2025 by admin Leave a Comment


Tere Ishq Mein Biggest Mistakes: एखादा सिनेमा हीट ठरल्यानंतर त्या सिनेमाच्या सिक्वलच्या प्रतिक्षेत चाहते असतात. असंच काही ‘रांझना’ सिनेमासोबत झालं आहे, 2013 मध्ये बनारस येथील कुंदन नावाच्या तरुणाची लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर आली होती. कुंदन प्रेमात उद्ध्वस्त होतो आणि त्यासोबत त्यांच्या प्रेमकहाणी देखील अपुरी राहते… ही लव्हस्टोरी मोठ्या पडद्यावर आणण्याचं काम दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी केलं. ‘रांझणा’ सिनेमा पुन्हा मोठ्या पडद्यावर आणण्याचं काम दिग्दर्शकाने केलं, पण येवेळी काही मोठ्या चुका दिग्दर्शकाकडून झाल्या…

चर्चा सुरु आहे नुकताच प्रदर्शिक झालेल्या ‘तेरे इश्क में’ सिनेमाची… सिनेमा प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. सिनेमाने फक्त तीन दिवसांत 52 कोटींचा व्यवसाय केला… “रांझणा” चे लेखक हिमांशू शर्मा यांच्यासोबत नीरज यादव यांनी या सिनेमाची कथा लिहिली. पण सिनेमा लिहिताना त्यांनी लॉजिकचा विराच केला नाही.

‘तेरे इश्क में’ सिनेमाची कथा..

जेव्हा जेव्हा तुम्हाला कळतं की बिहार तुम्हाला कळत आहे… तेव्हा तेव्हा बिहार तुम्हाला फार मोठा झटका देतो.. सिनेमाची कथा ‘महाराणी 4’ वेब सीरिजच्या डायलॉगसारखी आहे. 2 तास 47 मिनिटांच्या कथेमध्ये असे अनेक मोड येतात, जेथे तुम्हाला असं वाटतं की सिनेमा कळत आह … पण तेव्हाच असं काही होतं ज्यामुळे सस्पेंस अधिक वाढतो…

पहिला तास खूपच कंटाळवाणा

सिनेमाचा मध्यंतर चांगला वाटतो, पण क्लायमॅक्स रांझाना सिनेमासारखा नाही. पण ठिक – ठाक आहे… सिनेमाच्या सुरुवातीला फार कंटाळा येईल.. शंकर (धनुष) दिल्ली यूनिव्हर्सिटीमध्ये लॉचं शिक्षण घेत असको… पण सिनेमात तो अभ्यास करताना एकही सीन नाही… दुसरीकडे, मुक्ती (कृती सॅनन) आहे, जी तिच्या पीएचडीसाठी 2200 पानांचा प्रबंध तयार करते, परंतु तिचे प्राध्यापक तिचा विषय हलक्यात घेतात. सिनेमात एकही तगडा डायलॉग नाही. सिनेमातील पंचलाईन वल्गर असल्याचं दिसत आहे.. कारण भाषा आणि मर्यादेची काळजीच घेतली नाही… असं दिसत आहे.

टायटल गाण्याचा चुकीचा वापर…

निर्मात्यांनी ‘तेरे इश्क में’ हे शीर्षक गीत सर्वत्र वापरलं, मग ते टीझर असो किंवा ट्रेलर, पण जेव्हा सिनेमाचा विषय आला तेव्हा ते गाणे योग्यरित्या वापरण्यास विसरले. त्यासाठी कोणतीच योग्य परिस्थिती तयार करण्यात आली नाही. सिनेमात अनेक इंटेंस सीन आहेत. जेथे गाण्याचा वापर करुन सीन आणखी दमदार बनवता आला असतो… पण असं करण्यात आलं नाही. सिनेमात गाणं फक्त एकदाच वापरण्यात आलं आहे.

लॉचा विद्यार्थी आहे पण त्याला UPSC माहिती नाही…

धनुष हा लॉचा विद्यार्थी असण्यासोबतच दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष देखील आहे. मात्र, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात कमकुवत मुद्दा म्हणजे कायद्याचं शिक्षण घेत असलेल्या आणि विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या मुलाला UPSC बद्दल माहिती नाही. UPSC म्हणजे फक्त एक परीक्षा आणि त्य परीक्षेत उत्तिर्ण व्हावं लागेल… शंकरच्या भाषेत UPSC म्हणजे, उत्तर प्रदेश सेंकेंडरी स्कूल.

कृती हिची भूमिका

फक्त धनुषच नाही तर, कृती हिच्या भूमिकेला देखील लेखकाने फुलवण्याची गरज होती. या भूमिकेत प्रखरतेने जानवणारी गोष्ट म्हणजे, कृतीने सायकोलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. ती एक साइकोलॉजिस्ट आहे आणि डिफेंस काउंसलर म्हणून काम करते. लोकांनी मानसिक तणावातून मुक्त करणं हे तिचं काम आहे… पण सिनेमात तीच तणावाखाली असल्याचं दिसून येत आहे…

एकंदरीत, सिनेमात इतक्या त्रुटी आहेत की जर आपण त्या पूर्णपणे सांगितल्या तर आपण स्पॉयलर देऊ. थोडक्यात, जर तुम्हाला हा सिनेमा पहायचा असेल तर तुम्हाला लॉजीक सोडून चित्रपटगृहात बसा…



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकदाच गुंतवा, दर महिन्याला 5550 रुपयांच्या उत्पनाची गॅरंटी, पोस्टाची ही योजना भारी
  • अमिताभ बच्चन-रेखा यांच्या ब्रेकअपमागचं खरं कारण समोर; अभिनेत्रीच्या मैत्रिणीकडून खुलासा
  • आता माझ्या Bfला काय सांगू? टॅक्सीवाल्याशी शरीरसंबंधानंतर मानेवर लव्ह बाईट दिसताच विद्यार्थीनीचा भयंकर प्रताप
  • तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील वारंवार खराब होतात का? वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • मोबाईलमधले बॅकग्राउंड ॲप्समुळे तुमचा फोन हँग होतोय? त्यांना ‘या’ योग्य पद्धतीने करा बंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in