• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Team India : 1 मालिका, 3 सामने-15 खेळाडू, वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन दुखापतीमुळे आऊट

December 27, 2025 by admin Leave a Comment


टीम इंडिया नववर्षात 2026 मध्ये मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळणार आहे. दोन्ही संघांची ही नववर्षातील पहिलीच मालिका असणार आहे. न्यूझीलंडने या दोन्ही मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. तर बीसीसीआय टीम इंडियाची घोषणा केव्हा करणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा लागून आहे. अशात आता बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अंडर 19 टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने यौ दौऱ्यासाठी 15 खेळाडूंना संधी दिली आहे. अंडर 19 टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध  एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. उभयसंघात 3 ते 7 जानेवारी दरम्यान हे सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताचा नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि विहान मल्होत्रा या दोघांना दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन बदलण्यात आला आहे.

वैभव सूर्यवंशी याच्याकडे नेतृत्व

आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत त्याचा ओपनिंग पार्टनर वैभव सूर्यवंशी अंडर 19 टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे. तर एरॉन जॉर्ज याच्याकडे उपकर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत. वैभवने स्वत:ला प्रत्येक फॉर्मेटमध्ये सिद्ध केलं आहे. वैभवने आयपीएल, अंडर 19, इंडिया ए, लिस्ट ए क्रिकेट, यूथ वनडे, यूथ टेस्ट आणि टी 20 या सर्व प्रकारात खोऱ्याने धावा केल्या आहेत. तसेच वैभवने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात शतक ठोकलं होतं. मात्र आता वैभव कॅप्टन्सी कशी करतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 3 जानेवारी, विलोमूर पार्क

दुसरा सामना, 5 जानेवारी, विलोमूर पार्क

तिसरा सामना, 7 जानेवारी, विलोमूर पार्क

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अंडर 19 टीम इंडिया : वैभव सूर्यवंशी (कर्णधार), एरॉन जॉर्ज (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंग (विकेटकीपर), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलन ए पटेल, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, डी दीपेश, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन, युवराज गोहिल आणि राहुल कुमार.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Salman Khan : भाईजान 60 व्या वाढदिवशी मोठ्या अडचणीत… थेट कोर्टाकडून समन्स… काय आहे प्रकरण?
  • GK : भारतातील अशी ठिकाणे जिथे जाण्यासाठी भारतीयांनाही घ्यावी लागते परवानगी
  • हिवाळ्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात ‘या’ 5 गोष्टी करा मिक्स, तुमच्याकडे आकर्षित होईल संपत्ती
  • मधुमेहाच्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो का? वाचा…
  • Team India : टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका केव्हा? Final मध्ये पोहचण्याची किती संधी?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in