
नाशिकच्या तपोवनातील झाडे कापण्यास आता सुरुवात झाली असून, पर्यावरणप्रेमींचा याला तीव्र विरोध आहे. महानगरपालिकेने ४४७ झाडे तोडण्याची परवानगी असल्याचा दावा केला असला तरी, नाशिकमध्ये नवीन एसटीपी (STP) प्लांटसाठी जवळपास ३०० झाडे तोडल्याचे समोर आले आहे. पर्यावरणप्रेमींनी पालिका प्रशासनाने झाडांची कत्तल केल्याचा आरोप करत यावर आक्षेप घेतला आहे. घडलेल्या प्रकारावर पर्यावरणप्रेमींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तोडलेली झाडे लपवण्यासाठी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडण्यात आल्याचा दावाही पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या झाडांवर नंबरिंग देखील करण्यात आले होते, असे असतानाही नाशिककरांना विश्वासात न घेता ही वृक्षतोड झाल्याचे म्हटले जात आहे. यामुळे एकीकडे तपोवनातील १८०० झाडांचा वाद राज्यात गाजत असताना, दुसरीकडे पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे.
Leave a Reply