
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही देखील चित्रपटसृष्टीत आली. गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या पडद्यावर काम करणाऱ्या सोनाक्षी सिन्हा हिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल आयुष्याचीच जास्त चर्चल असते. जहीर इक्बाल सोबत आंतरधर्मीय लग्न केल्यावर तर तिच्याबद्दल बरंच काही बोललं गेलं, पण तिने टीकाकारांकडे लक्ष न देताच त्यांना गप्पं केलं. शत्रुघ्न सिन्हा यांना सोनाक्षी ही एक मुगी तर लव-कुश ही जुी मुलंही आहेत. सोनाक्षीच्या लग्नात त्यांच्या अनुपस्थितीची बरीच चर्चा झाली होती. तिचं लग्न त्यांना मान्य नव्हतं, अशाही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र सिन्हा कुटुंबाने किंवा दोन्ही भावांपैकी कोणीच या विषयाला जास्त हवा दिली नाही.
दरम्यान आता याच लव आणि कुश सिन्हाबद्दल एका मोठा खुलासा झाला आहे. रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका माहीत नाही असा माणूस विरळाच. त्यांची ही मालिका भारतीय टेलिव्हिजनमधील एक मैलाचा दगड ठरली होती, ज्याने प्रेक्षकांच्या हृदयावर अशी छाप सोडली की ती आजही कायम आहे. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या या मालिकेने वाल्मिकी यांच्या रामायणावर आधारित कथा घराघरात पोहोचवली. अरुण गोविल (राम), दीपिका चिखलिया (सीता), सुनील लहरी (लक्ष्मण), आणि दारा सिंह (हनुमान) यांनी या मालिकेला अमर केलं, ज्याची आठवणही आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. याच मालिकेशी निगडीत अनेक किस्से आहेत. त्यापैकूच एक मजेशीर किस्सा लव-कुश भूमिका साकाऱणाऱ्या बालकलाकांरांशी निगडीत आहे.
शत्रुघ्न सिन्हांच्या मुलांना मिळाली असती संधी
रामायणातील उत्तर कांडात लव आणि कुश ही पात्रं महत्त्वाची होती. रामानंद सागर यांनी सुरुवातीला अभिनेता-राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांच्या जुळ्या मुलांना (लव आणि कुश सिन्हा) या भूमिकांसाठी कास्ट करण्याचा विचार केला. मात्र अनेक कारणांमुळे हे शक्य झाले नाही. त्यानंतर करामानंद सागर यांनी दुसऱ्या बाल कलाकारांचा शोध सुरू केला आणि महाराष्ट्रातील दोन तरुण मुलांवर लक्ष केंद्रित केले. स्वप्नील जोशी (कुश म्हणून) आणि मयुरेश क्षेत्रमडे (लव्ह म्हणून) मालिकेत झळकले. त्यांच्या निरागस चेहऱ्यांनी आणि अभिनयाने सर्वाचं मन जिंकून घेतलं.
टॅक्सी ड्रायव्हरमुळे सापडले लव कुश
एका मुलाखतीत रामानंद सागर यांनी या बाल कलाकारांसोबत सेटवर घडलेल्या मजेदार घटना सांगितल्या. ते म्हणाले, “दिल्लीतील काही कलाकारांनी मला खूप छळलं. झालं असं की कानपूरला जाताना मला “लव कुश” असं लिहिलेली एक टॅक्सी दिसली. उत्सुकतेपोटी मी ड्रायव्हरला विचारलं,तेव्हा त्याने मला सांगितलं की ती त्याच्या बॉसच्या मुलांची नावे आहेत. मी त्या मुलांना ऑडिशनसाठी बोलावलं. ते लव आणि कुश या पात्रांच्या अगदी वयाचे होते. त्या ऑडिशनमध्ये पास झाल्यानंतर, रामानंद सागर यांना वालं की हे दोघे खोडकर आहेत, परंतु ते चांगले कलाकार देखील असतील. मात्र शूटिंग सुरू झाल्यावर अडचणी वाढल्या. सेटवर आल्यानंतर, दोघेही तयार होऊन बसायचे, पण कॅमेरा चालू होताच ते काम करण्यास नकार द्यायचे. त्यानंतर रामानंद सागर यांनी लव-कुश यांना या भूमिकेसाठी न घेता दुसऱ्या मुलांची ऑडिशन घेऊन त्यांना कास्ट केलं. अन्यथा शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुलीप्रमाणेच, त्यांची दोन मुलंही आज अभिनय क्षेत्रात दिसली असती
Leave a Reply