• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Smriti Mandhana: लग्न मोडल्यावर स्मृती मानधनाचे अनेक खुलासे, पहिल्यांदाच सगळं सांगितलं; म्हणाली मी दिवस-रात्र…

December 12, 2025 by admin Leave a Comment


भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. ती पलाश मुच्छल या संगीतकाराशी लग्न करणार होती. मात्र, आता त्यांचे लग्न मोडले आहे. स्मृतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न मोडल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर स्मृती पहिल्यांदाच एका कार्यक्रमात हजेरी लावताना दिसली. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींवर बिनधास्तपणे मत मांडले. तिने खासगी आयुष्यावरही भाष्य केले आहे. आता स्मृती नेमकं काय म्हणाली वाचा…

काय म्हणाली स्मृती मानधना?

लग्न मोडल्यानंतर स्मृती पहिल्यांदाच सार्वजनिक व्यासपीठावर दिसली. दिल्लीत एका कार्यक्रमात ती कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत उपस्थित होती. त्यावेळी स्मृतीने सांगितले की, क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्व ती आपल्या आयुष्यात दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला देत नाहीत. फक्त चेंडू पाहायचा आणि मारायचा! स्मृती मानधनाने या कार्यक्रमात मन मोकळे करून बोलताना स्वतःच्या मानसिकतेवरही भाष्य केले.

मानसिकदृष्ट्या स्वतःला कसे मजबूत ठेवतात, यावर स्मृती म्हणाली की, “मी नेहमी खूप साधी व्यक्ती राहिली आहे, कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करून आयुष्य अवघड करून घेत नाही. मला ज्यावर पूर्ण विश्वास आहे तो म्हणजे, जर तुम्ही पडद्यामागे खूप मेहनत घेतली, कारण मैदानावर जे काही घडते ते सगळेच पाहतात आणि न्याय देतात; पण मी स्वतःला किंवा संघाला पडद्यामागे केलेल्या त्या कामावरूनच न्याय देते. त्या कामाला दिवसरात्र झोकून देण्याचा मला खूप अभिमान आहे. मला चांगले वाटत असो किंवा वाईट, काहीही असो, पण जर तुम्ही ती मेहनत घेतली तर पुढे काय होणार याचा खूप आत्मविश्वास येतो.”

सोशल मीडिया पोस्टने दिली माहिती

पुढे बोलताना ती म्हणाली, “मला क्रिकेटपेक्षा जास्त काहीही आवडत नाही. भारतीय जर्सी घालणे हाच माझा सगळ्यात मोठा प्रेरणास्रोत आहे. लहानपणापासूनच माझे स्वप्न होते की लोक मला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ म्हणतील.” स्मृती मानधनाचे गायक-संगीतकार पलाश मुच्छलशी 23 नोव्हेंबरला लग्न होणार होते, ते स्थगित झाले. दोघांनी सोशल मीडियावर नातं संपुष्टात आल्याची आणि वैयक्तिक आयुष्यात पुढे जाण्याची माहिती दिली होती.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ राशींच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये, नियम जाणून घ्या
  • CM Fadnavis: फडणवीस यांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले, जास्तीत जास्त…
  • Thackeray Brothers Alliance : मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती जाहीर होणार?
  • Dhurandhar : FA9LA गाण्यावर अक्षय खन्नाची एण्ट्री गाजली, ‘खोश फसलाह’ तुम्हीही गाऊ शकता, इतके सोपे आहेत लिरिक्स
  • Chanakya Neeti : या 3 गोष्टी आहेत आयुष्यातील सर्व अडचणींचं कारण, आयुष्यभर करावा लागेल पश्चताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in