
मुंबई क्रिकेट टीमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत सुपर लीग सामन्यात हरयाणावर 4 विकेट्सने विजय मिळवला. यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान ही जोडी मुंबईच्या विजयाची हिरो ठरली. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)
हरयाणाने मुंबईसमोर 235 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 15 बॉलआधी 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईने 17.3 ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण केलं. तसेच मुंबई या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारी दुसरी टीम ठरली. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)
यशस्वी जैस्वाल याने विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक आणि शतकी खेळी केली. यशस्वीला त्याच्या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. यशस्वीने यावेळेस दिलदारपणा दाखवला. यशस्वीने अर्धशतक करणाऱ्या सर्फराज खान याच्यासह ही ट्रॉफी शेअर केली. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)
मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराची बक्षिस रक्कम ही 50 हजार रुपये इतकी आहे. यशस्वीने सर्फराजसह ट्रॉफीसह ही रक्कमही शेअर केली. सर्फराजने या सामन्यात 64 धावा केल्या. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)
मुंबईला याआधीच्या सामन्यात हैदराबादकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मोहम्मद सिराज हा हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरलेला. सिराजने तेव्हा तन्मय अग्रवाल याच्यासह मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आणि बक्षिस रक्कम शेअर केली होती. (Photo Credit: Twitter/Jio Hotstar)




Leave a Reply