
आजघडीला गुंतवणूक करायची म्हटलं की सर्वात अगोदर लोक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करतात. दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर दमदार परतावा मिळतो म्हणून अनेकजण म्युच्यूअल फंडात पैसे टाकण्याचा निर्णय घेतात. परंतु प्रत्येकासाठीच ही गुंतवणूक योग्य नाही. तुमचे ध्येय्य, गुंतवणुकीचा कालावधी आणि जोखमी घेण्याची क्षमता यावरून तुम्ही म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करावी की नाही हे ठरवावे.
एसआयपीच्या माध्यमातून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करणे हा पर्याय प्रत्येकासाठीच योग्य ठरत नाही. तुम्ही जर कमी कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर मग एसआयपीच्या माध्यमातून केली जाणारी गुंतवणूक तुमच्यासाठी नाही.
तुम्ही जेव्हा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करता तेव्हाच तुम्हाला म्युच्यूअल फंडातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. तु्ही फक्त प्राप्तिकर वाचवण्यासाठी एसआयपी करत असाल तर हादेखील दृष्टीकोन चुकीचा आहे. तुम्हाला भांडवली बाजारातील चढ-उताराची जोखीम नको असेल तर एसआयपीत गुंतवणूक करणे चुकीचे आहे.
तुम्हाला अजिबात जोखीम घ्यायची नसेल तर एसआयपी तुमच्यासाठी नाही. भारतीय पोस्ट बँकेच्या काही योजनांत गुंतवणूक करता येते. तसेच एफडी यासारखे पर्यायही तुमच्यासाठी चांगले आहेत. कारण म्युच्यूअल फंडातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असते. त्यामुळेच तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही एसआयपीत गुंतवणूक करू नये.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)




Leave a Reply