
भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे शुबमनला दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यानंतर शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेदरम्यान दुखापत झाली. त्यामुळे शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या 2 सामन्यांना मुकावं लागलं. उभयसंघातील चौथा सामना हा धुक्यांमुळे रद्द करावा लागला होता. त्यानंतर शुबमनला दुखापतीमुळे पाचव्या टी 20i सामन्यात खेळता आलं नाही. शुबमनची दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यादरम्यानची दुखापत होण्याची दुसरी वेळ ठरली. त्यामुळे टीम इंडियाची आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी चिंता वाढली आहे. आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी 20 डिसेंबरला भारतयी संघाची घोषणा होणार आहे. त्याआधी 19 डिसेंबरला बीसीसीआयने शुबमनच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे.
Leave a Reply