• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shubman Gill याचा धमाका, प्रिन्स 3 वर्षात सलग दुसऱ्यांदा 1 नंबर, नक्की काय केलं?

December 28, 2025 by admin Leave a Comment


टीम इंडियाचा प्रमुख फलंदाज शुबमन गिल याच्यासाठी 2025 वर्षातील शेवट काही खास राहिला नाही. बीसीसीआयने शुबमनला आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीममधून डच्चू दिला. मात्र हा अपवाद वगळता शुबमनने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केली. (Photo Credit: PTI)

Shubaman Gill Test Cricket

शुबमनला 2025 वर्षात कसोटी आणि एकदिवसीय संघांच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. शुबमनने यासह रोहित शर्मा याची जागा घेतली. शुबमनने वर्षभरात अपवाद वगळता बॅटिंगने चमकदार कामगिरी केली. शुबमन 2025 वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज ठरला. (Photo Credit: PTI)

Team India Test Captain Shubman Gill

शुबमन 2025 वर्षात कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 35 सामन्यांमध्ये खेळला. शुबमनने त्यापैकी 42 डावांत 49 च्या सरासरीने 1 हजार 764 धावा केल्या. शुबमनने या दरम्यान 7 शतकं 3 अर्धशतकं झळकावली. याआधी 2 हजार 54 आंतरराष्ट्रीय धावांसह शुबमन 2023 मध्ये सर्वाधिक रन्स करणारा पहिला फलंदाज ठरला होता. (Photo Credit: PTI)

Shubman Gill Test Century

तसेच शुबमन 2025 या वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. शुबमनने या वर्षभरात एकूण 983 धावा केल्या. शुबमनने 983 पैकी 754 धावा या इंग्लंड दौऱ्यात केल्या. शुबमनने या दौऱ्यात 4 तर वेस्ट इंडिज विरुद्ध 1 शतक झळकावलं. (Photo Credit: PTI)

Shubman Gill Indian Cricket Team

तसेच शुबमनने 2025 वर्षात 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 49 च्या सरासरीने 2 शतकं आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 490 धावा केल्या. मात्र शुबमन टी 20i क्रिकेटमध्ये अपयशी ठरला. शुबमनला 15 टी 20i डावांत 291 धावाच करता आल्या. शुबमनला या वर्षात टी 20i क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक करता आलं नाही. (Photo Credit: PTI)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याचं थाटामाटात लग्न; पहा खास फोटो
  • फेस स्टिम घेण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का?
  • राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश
  • Solapur : तृतीयपंथीयाच्या हत्येप्रकरणात त्याच्या तीन मित्रांनाच अटक, एक इंजिनिअरींगचा विद्यार्थी
  • Seema Haider : तो 6 लेकरांचा बाप तरीही…सीमा हैदर सचिनवर भडकली; तक्रारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in