
Shubhangi Atre : ‘भाभी जी घर पर है’ फेम अभिनेत्री शुभांगी हिने 2003 मध्ये पियुष पुरे याच्यासोबत लग्न केलं. पियुष हा डिजिटल मार्केटींगमध्ये जॉब करत होता. लग्नानतंर दोघांनी मुलीचं देखील जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला… दोघांचं नातं 2022-23 या काळात वाईट प्रसंगांचा सामना करत होता. अखेर फेब्रुवारी 2025 मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. मात्र, एप्रिल 2025 मध्येच तिचं निधन झालं. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
खासगी आयुष्यावर अभिनेत्री म्हणाली, ‘घटस्फोटाचा निर्णय मी फक्त माझ्यासाठी घेतला नव्हता. तर इतका मोठा निर्णय मी माझ्या मुलीसाठी घेतला… कारण त्या नात्याचा माझ्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत होता… जेव्हा तुम्ही एखाद्या नात्यात स्वतःला गुंतवून घेता तेव्हा त्याचा खोलवर परिणाम होतो. म्हणून, त्या नात्याचा माझ्यावर परिणाम होऊ लागला. मला चिंता वाटू लागली.’
‘एक काळ असा होता जेव्हा मला कोणालाच भेटायचं नव्हतं. म्हणूनच मी काम करत होती. फक्त काम करत होतो. आणि मला या गोष्टीचा दिलासा मिळतो की माझ्या वैयक्तिक आयुष्यात कितीही घडामोडी घडल्या तरी मी त्याचा कधीही परिणाम होऊ दिला नाही. कधीच नाही.
घटस्फोटावर काय म्हणाली शुभांगी
शुभांगी अत्रे हिने सांगितलं की, पियुषपासून वेगळं होणं… हा निर्णय माझ्यासाठी फार मोठा होता… पण जवळच्या वक्तींनी कधीच शुभांगी हिची साथ सोडली नाही. ‘घटस्फोटाच्या दरम्यान कुटुंब, मुलगी, मित्र सगळे माझ्यासाठी मोठा आधार होते. माझ्या आयुष्यात अनेक अशा घडल्या. ज्यामुळे मी खूप काही शिकली…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
दुसऱ्यांदा लग्न करणार शुभांगी अत्रे?
दुसऱ्या प्रेमात पडणार का? अशा प्रश्न देखील अभिनेत्रीला विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘याबद्दल माहिती नाही… सध्या तरी असा कोणता विचाकर नाही… मी स्वतःला दुसरं लग्न करण्यासाठी भाग पाडत देखील नाही. सध्या माझं पूर्ण लक्ष माझ्या आशीवर आहे.’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.
Leave a Reply