
गेल्या कित्येक दशकांपासून अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’या शोचं होस्टिंग करतात, घराघरात पोहोचलेल्या यो शोचे आणि अमिताभ यांचे खूप चाहते असतात. काही लोकांना या शोमध्ये जाऊन हॉटसीटवर बसायची संधी मिळते. तेव्हा त्यांना सहज वाटावं म्हणून बिग बी त्यांच्याशी गप्प मारतात, इकडचे तिकडचे प्रश्न विचारतात. असाच एक चाहता केबीसीमध्ये आला,तेव्हा बोलता बोलता त्याची इच्छा सांगून गेला. तो कंटेस्टंट अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मोठा चाहता असून एकदा तिच्यासोबत कॉफी डेटवर जाण्याची इच्छा आहे,असं त्याने सांगितलं. मात्र त्यावर श्रद्धा कपूरची प्रतिक्रिया आली असून तिनेच एका व्यक्तीसोबत कॉफी प्यायची इच्छा व्यक्त केली. ती व्यक्ती म्हणजेच बिग बी.. तिची ही रिॲक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांना ते आवडलं.
श्रद्धा कपूरला डेटवर नेण्याची चाहत्याची इच्छा
खरंतर हॉटसीटवर बसल्यावर त्या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना सांगितलं की तो श्रद्धाचा फॅन आहे. ‘ मला वाटतं श्रद्धाजींचा, माझ्याइतका वेडा चाहता असूच शकत नाही. सर, एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो, पण मी श्रद्धाजींना एकदाच डेटवर घेऊन जाऊ इच्छितो.’ असं तो म्हणाला. त्यावर अमिताभ यांनी त्यांना मजेशीर प्रश्न विचारला. श्रद्धा कपूरचे वडील कोण आहेत, माहीत आहे ना ? त्यावर स्पर्धकाने उत्तर दिले की, हो,मला माहित आहे,तिचे वडील शक्ती कपूर आहेत, ज्यांना क्राइममास्टर गोगो म्हणूनही ओळखले जातं,असं तो मजेत म्हणाला. .
हे ऐकून अमिताभ यांना हसू आलं आणि कॅमेऱ्यात पाहून ते श्रद्धा कपूरला म्हणाले की, तू जर हा शो बघत असशील तर या स्पर्धकाच्या ऑफरचा विचार कर आणि त्याच्यासोबत डेटवर जाऊन कॉफी पी.. ते ऐकून स्पर्धकाच्या चेहऱ्यावरही हसू फुललं आणि त्याने बिग बींचे आभार मानले. ही मजेदार क्लिप सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर करण्यात आली आहे आणि चाहत्यांना ती खूप आवडली आहे.
श्रद्धाल प्यायची आहे बिग बींसोबत कॉफी
याच दरम्यान, श्रद्धा कपूरने मजेदार विनंतीला लगेच प्रतिसाद दिला आणि तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्टही टाकली. तिने पोस्ट शेअर करत लिहीलं, ‘@amitabhbachchan सर, मी तुमची सर्वात मोठी फॅन आहे, सर्वात पहिले तुम्ही माझ्यासोबत कॉफी प्या’.पुढे श्रद्धाने म्हटलं, ‘ “तुम्ही प्रत्येक गोष्ट उत्तम दर्जाची, प्रतिष्ठित आणि सुंदर बनवू शकता. जगातील सर्वोत्तम यजमान (होस्ट).” अशा शब्दांत तिने बिग बी यांचं कौतुकही केलं.

श्रद्धा कपूरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात 2010 साली आलेल्या “तीन पत्ती” या चित्रपटातून केली, ज्यामध्ये अमिताभ बच्चन देखील होते. अलीकडेच श्रद्धा ही हॉरर-कॉमेडी “स्त्री 2” मध्ये दिसली, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.
Leave a Reply