
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शोमधून शिवाली परबने महाराष्ट्रतील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिच्या विनोदी भूमिका आणि विनोदाच्या परफेक्ट टायमिंगमुळे तिचा मोठा चाहता वर्ग आहे. शिवाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. तिने 'प्रेम प्रथा धुमशान' आणि 'मंगला' सारख्या चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सध्या शिवाली एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.
शिवालीने अलीकडेच एक हटके आणि ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. तिने या फोटोशूटचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये शिवालीने पिवळ्या रंगाची साडी, त्यावर ब्लाऊज आणि ब्लेझर घातला होता. ज्वेलरी म्हणून चोकर आणि लाँग नेकलेस वापरला होता. केसांचा बन बांधून काळ्या रंगाचा गॉगल लावला आहे. फोटोशूटमधील काही पोझ खूप डॅशिंग आणि स्टायलिश होत्या, ज्यामुळे चाहत्यांनी सुरुवातीला कौतुक केले.
फोटोशूटमधील एका खास फोटोमुळे शिवाली ट्रोल होत आहे. या फोटोत तिने गॉगल कमरेला (नाभीजवळ) लावलेला आहे आणि या पोजमध्ये ती फोटोसाठी पोज देते. या फोटोमध्ये तिची नाभी दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
नेटकऱ्यांना शिवालीची ही पोज अजिबात आवडलेली नाही. त्यांनी शिवालीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने 'चष्मा चुकीच्या जागी लावला' असे म्हणत टीका केली. काहींनी थेट प्रश्न उपस्थित केले की “नक्की काय दाखवायचे आहे?
चष्मा अयोग्य ठिकाणी आहे का?”, “हे चांगलं दिसत नाहीये”, “नक्की काय दाखवायचंय?” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. काहींनी हे अश्लील किंवा अनावश्यक मानले, ज्यामुळे सोशल मीडियावर या फोटोची जोरदार चर्चा सुरू झाली. शिवालीने यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.




Leave a Reply