
Shehnaaz Gill : अभिनेत्री शेहनाज हिला आज कोणाची ओळख नाही. शेहनाज हिने फक्त पंजाबी सिनेविश्वातच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील स्वतःचं नाव मोठं केलं आहे. ‘बिग बॉस’नंतर शेहनाज हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. पण बिग बॉसनंतरचा प्रवास शेहनाज हिच्यासाठी सोपा नव्हता.. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शेहनाज हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ठेच लागल्यानंतर शहाणपण आलं… एवढंच नाही तर, याठिकाणी सगळे राक्षस आहेत… असं देखील शेहनाज म्हणाली. सध्या सर्वज फक्त आणि फक्त शेहनाज गिल हिच्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
एका कार्यक्रमा दरम्यान शेहनाज गिल हिला विचारण्यात आलं की, ज्या लोकांनी फसवणूक केली आहे. त्या लोकांसोबत कशी डील करते? यावर अभिनेत्री म्हणाली, ‘कायम स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला हवं… धीट राहायला आलं पाहिजे आणि आपले आश्रू कामावर अधिक खर्च केले पाहिजे… मला एकच गोष्ट सांगायची आहे… ठेच लागल्यानंतर मला शहाणपण आलं आहे… सुरुवातीच्या काळात मी अनेक वाईट परिस्थितींचा सामना केला आहे… जर स्ट्रगलनंतर तुम्ही मोठे झालात तर गोष्टी फार बदलतात…’
पुढे शेहनाज म्हणाली, ‘सुरुवातीला सगळे मला मुर्ख समजायचे… जेव्हा मी फनी आणि बबली होती… जेव्हा लोकं तुमची फसवणूक करतात आणि आयुष्यातील वास्तव तुमच्या समोर येतं, तेव्हा तुम्ही अधीक सतर्क होता… आयुष्यात मोठा धडा तुम्हाला शिकायला मिळतो…’
‘स्वतःची पडती बाजू कधीच कोणाला दाखवू नका… लोकं या गोष्टीचा फायदा घेतील. याठिकाणी सगळे राक्षस आहे… जी व्यक्ती तुमच्या फार जवळची आहे. तिच्याकडेच फक्त व्यक्त व्हा…’ असं देखील शेहनाज म्हणाली. सांगायचं झालं तर, शेहनाज हिने अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. आज देखील अभिनेत्री कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, चाहते देखील शेहनाज हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात…
शेहनाज गिल सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील शेहनाज हिची प्रत्येक पोस्ट प्रचंड आवडते…
Leave a Reply