• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shafali Verma : लेडी सेहवागचा श्रीलंकेविरुद्ध तडाखा, शफाली वर्मा हीची अर्धशतकांची हॅटट्रिक

December 28, 2025 by admin Leave a Comment


वूमन्स टीम इंडियाची लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीने श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत तडाखा कायम ठेवला आहे. शफालीने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात तिरुवनंतरपुरममध्ये वादळी अर्धशतक झळकावलं आहे. शफालीने यासह या मालिकेत एकूण आणि सलग तिसरं अर्धशतक ठोकलं आहे. शफालीने या खेळीदरम्यान चौफेर फटकेबाजी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. तसेच दुसऱ्या बाजूने शफालीची ओपनिंग पार्टनर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना हीनेही टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली.

शफालीला या मालिकेतील सलामीच्या सामन्यात काही खास करता आलं नाही. शफाली दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरली. मात्र शफालीला दुसर्‍या सामन्यानंतर सूर गवसला. शफालीने आपली ताकद दाखवत सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात शतक ठोकलं. शफालीने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना अर्धशतक झळकावलं आणि भारताच्या विजयात योगदान दिलं.

शफालीची अर्धशतकी हॅटट्रिक

श्रीलंकेन टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. त्यानंतर टीम इंडियाकडून शफाली आणि स्मृती ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघींनी सुरुवातीपासूनच टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत श्रीलंकेच्या गोलंदाजांना बॅकफुटवर टाकलं. शफालीने चौकारांची बरसात केली. शफालीने 11 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर फोर ठोकला. शफालीने यासह अवघ्या 30 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं. शफालीने या खेळीत 9 चौकार ठोकले.

शफाली वर्मा तिसरी महिला भारतीय क्रिकेटर

दरम्यान शफालीने यासह खास यादी स्थान मिळवलं. शफाली टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सलग 3 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा 50 प्लस रन्स करणारी तिसरी फलंदाज ठरली. शफालीआधी मिताली राज आणि स्मृती मंधाना या दोघींनी संयुक्तरित्या सलग 4 वेळा अर्धशतक झळकावलं आहे.

शफालीचं 12 वं टी 20i शतक

𝐔𝐧𝐬𝐭𝐨𝐩𝐩𝐚𝐛𝐥𝐞 🔥

3⃣rd consecutive FIFTY for Shafali Verma 🫡

Her 1⃣4⃣th in T20Is 🔥

Updates ▶ https://t.co/9lrjb3dMqU #TeamIndia | #INDvSL | @TheShafaliVerma | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/93hfarRN3S

— BCCI Women (@BCCIWomen) December 28, 2025

शफालीला मिताली आणि स्मृतीच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

मिताली राज हीने 2016 ते 2018 दरम्यान सलग 4 टी 20i अर्धशतकं केली होती. भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हीने 2024-2025 दरम्यान हा कारनामा करत मितालीच्या विक्रमाची बरोबरी साधली होती. त्यानंतर आता शफालीने ही कामगिरी केली आहे. आता शफालीला या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात अर्धशतक करत मिताली राज आणि स्मृती मंधाना या दोघींच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cheapest Beer: केवळ 18 रुपयांमध्ये बिअर, या देशात पाण्यापेक्षा स्वस्तात मिळतेय दारू
  • मोठी बातमी ! जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच अचानक शिवसेनेच्या बड्या नेत्याची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
  • ऑपरेशन सिंदूरमध्ये 36 तासात 80 ड्रोन हल्ले, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानानेच भारताचा पराक्रम सांगितला; नवी माहिती समोर!
  • ई-सिगारेट ओढायची, थेट डोळेच गेले, महिलेसोबत भयंकर घडलं; डॉक्टरांच्या इशाऱ्याने चिंता वाढली!
  • वंचित-काँग्रेस यांच्यात ऐतिहासिक युती, मुंबई पालिका निवडणुकीचं गणित बदलणार; नेमकं काय होणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in