
बीड येथील संतोष देशमुख यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कुटुंबीयांनी न्यायासाठी पुन्हा एकदा आवाहन केले आहे. संतोष देशमुख यांच्या भावाने, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण लढत राहू अशी भावना व्यक्त केली. येत्या १२ तारखेला आरोप निश्चिती होणार असून, त्यानंतर लवकर न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशमुख कुटुंबियांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास दर्शवत, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
संतोष देशमुख यांच्या आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मस्साजोग येथे जरांगे पाटील, अंबादास दानवे, बजरंग सोनावणे, संदीप शिरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. न्यायाच्या या लढाईत सोबत असलेल्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन धनंजय देशमुख यांनी केले आहे. कुटुंबाचे दुःख मोठे असून, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळणे आवश्यक आहे.
Leave a Reply