• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Salman Khan : 2 आई, 2 भाऊ, आणि… सलमानच्या कुटुंबात कोण-कोण ? पहा फॅमिली ट्री

December 27, 2025 by admin Leave a Comment


Salman Khan Family Tree : बॉलिवूडमध्ये अनेक कुटुंबे आली आणि गेली, पण वांद्रे येथील “गॅलेक्सी अपार्टमेंट्स” अजूनही आपल्या वर्चस्वाला साजेसा रुबाब टिकवून आहे. आज, 27 डिसेंबर, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) याचा आज 60 वा वाढदिवस आहे. 36 वर्षांची चित्रपट कारकीर्द, शेकडो ब्लॉकबस्टर चित्रपट आणि लाखो चाहते आहेत सलमानचे, पण त्याच्यासाठी सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याचे कुटुंब. बॉलिवूडमध्ये नाती तयार होण्यास किंवा तुटण्यास जास्त वेळ लागत नाही असं अनेकदा म्हटलं जाते, परंतु सलीम खान यांच्या या कुटुंबाने प्रत्येक कठीण काळात एकमेकांचा हात ठामपणे धरला आहे. सलमानचा या वर्षीचा वाढदिवस देखील खास आहे कारण खान कुटुंबात एका छोट्या परीचे, लेकीचे आगमन झाले आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याची फॅमिली ट्री..

सलीम खान

सलमान खानच्या “खानदाना”ची कथा, दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांच्यापासून सुरू होते. “शोले” आणि “दीवार”यांसारखे अनेक उत्कृष्ट, सदाबहार चित्रपट लिहिणारे सलीम यांनी स्वतःचं कुटुंबंही उत्कृष्ट पटकथेसारखं आहे. सलीम खान यांनी 1964 साली सलमा खान (सुशीला चरक) यांच्याशी लग्न केलं. त्यांच्यापासून त्यांना चार मुले आहेत, परंतु 1981 मध्ये जेव्हा त्यांनी प्रसिद्ध नृत्यांगना हेलेनशी दुसरे लग्न केले तेव्हा समाजात अनेक प्रश्न उपस्थित झाले.

 

पण सलीम खान यांची शिस्त आणि प्रेमामुळेच सलाम आणि हेलन या केवळ एकत्रच राहिल्या नाहीत, तर सलमानसह सर्व भावंडांनी हेलन यांना ‘दुसऱ्या आई’चा दर्जा दिला. गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरात आज संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन सगळे सण साजरे करतात. सलीम खान आणि सलमा खान यांचा मोठा मुलगा सलमान खान आज एक जागतिक ब्रँड आहे.

1988 साली “बिवी हो तो ऐसी” या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणारा सलमान आज भारतीय बॉक्स ऑफिसचा खरा “टायगर” आहे. विशेष म्हणजे, वयाच्या 60 व्या वर्षीही सलमान अविवाहित राहिला आहे. त्याने आपले संपूर्ण आयुष्य त्याच्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी आणि त्याच्या भावंडांच्या पालनपोषण करण्यासाठी समर्पित केले. तो अजूनही त्याच्या वडिलांच्या जवळ राहण्यासाठी वांद्रे येथील एका लहानशा बीएचके फ्लॅटमध्ये राहतो.

58 व्या वर्षी पुन्हा पिता बनला सलमानचा भाऊ अरबाज

2025 हे वर्ष सलीम खान यांचा मुलगा आणि सलमानचा धाकटा भाऊ अरबाज खानसाठी अत्यंत भाग्यवान ठरलं. हे वर्ष अरबाजच्या आयुष्यात एक असा वळण देणारा टप्पा ठरला ज्याने त्याच्या संपूर्ण कुटुंबाच्या आनंदात भर घातली. डिसेंबर 2023 मध्ये अरबाज खानने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. ऑक्टोबर 2025 मध्ये अरबाज आणि शूरा यांना एका मुलगी झाली. अरबाजने त्याच्या मुलीचे नाव सिपारा खान ठेवले. वयाच्या 58 व्या वर्षी पुन्हा वडील झाल्यानंतर अरबाज खूप आनंदी आहे, सलमान खान देखील त्याच्या लहान भाचीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसतो.

शूरा पूर्वी अरबाजचं लग्न मलायका अरोराशी झालं होतं, 2017 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. अरहान आता मोठा झाला आहे आणि तो अनेकदा त्याच्या वडिलांची दुसरी पत्नी शूरा आणि धाकटी बहीण सिपारासोबत वेळ घालवताना दिसतो. चाहते अरहानच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

खान कुटुंबातील धाकटा आण लाडका सोहेल खान

सलीम खान यांचा धाकटा मुलगा सोहेल खान आहे. सलमानचा लहान भाऊ असलेल्या सोहेलने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले, परंतु त्याला खरी ओळख निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मिळाली. सोहेल खानने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि ‘जय हो’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. सोहेल खानने 1998 मध्ये सीमा सजदेहशी लग्न केले, परंतु 24 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2022 मध्ये या दोघांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला.
निर्वाण खान आणि योहान अशी दोन मुलं सोहेलला आहेत. निर्वाण खान अनेकदा त्याचा चुलत भाऊ अरहानसोबत पार्ट्यांमध्ये दिसतो आणि लवकरच तो अभिनय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आहेत.

सलमानचं बहिणींवर निस्सीम प्रेम

सलमान खानची बहीण अलविरा ही क्वचितच कॅमेऱ्यासमोर येते, पण ती सलमान खानच्या बिझनेसचा आणि प्रॉडक्शन हाऊसचा कणा आहे. अलविराचे लग्न प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीशी झाले आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यांची मुलगी, अलिझेह अग्निहोत्री हिने 2023 मध्ये आलेल्या “फरे” चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये जबरदस्त पदार्पण केले, तिच्या अभिनयासाठी तिचं खूप कौतुक झालं. त्यांचा मुलगा, अयान अग्निहोत्री, सध्या चित्रपट फिल्म मेकिंगचे बारकावे शिकतोय.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलीम खान यांनी दत्तक घेतलेली मुलगी, अर्पिता खान, ही कुटुंबातील सर्वात छोटी आणि लाडकी आहे. सलमानचे त्याच्या बहिणींवरील प्रेम वेळोवेळी दिसलं आहे. 2014 साली हैदराबादमधील फलकनुमा पॅलेसमध्ये एका भव्य समारंभात अर्पिताने आयुष शर्माशी लग्न केले. त्यांना आहिल हा मुलगा तर आयत ही मुलगी अशी दोन अपत्यं आहेत. एका विशेष योगायोग म्हणजे अर्पिताची लेक आयत हिचा जन्मही 27 डिसेंबरला झाला असून ती मामा सलमानसोबत बर्थडे शेअर करते.
म्हणूनच दरवर्षी 27 डिसेंबर रोजी सलमान खान त्याचा आणि त्याची भाची आयतचा वाढदिवस एकत्र साजरा करतो.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हॅरी ब्रुकने गिलख्रिस्टचा कसोटी विक्रम मोडला, असा गाठला 3 हजार धावांचा पल्ला
  • जनावरांसारखं वागू नका..; लाइव्ह शोमध्ये गोंधळ घालणाऱ्यांवर भडकले कैलाश खेर
  • मोठी बातमी! राज ठाकरेंना मोठा धक्का, 2 बडे नेते एकनाथ शिंदेंच्या गळाला, थेट पक्ष प्रवेशाने मनसेत खळबळ
  • Post Office Scheme : 333 रुपयांची भन्नाट गुंतवणूक योजना, शंभर टक्के 1700000 रुपये मिळणार, का होतेय चर्चा?
  • Salman Khan Net Worth: सलमान खान या मार्गांनी कामावतो पाण्यासारखा पैसा… जाणून व्हाल अवाक्

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in