
गेल्या काही काळापासून युक्रेन आणि रशियामधील युद्ध सुरू आहे. जगभरातील देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही अनेकदा दोन्ही देशांमधील युद्ध थांबणार असल्याचे विधान केले आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धाबाबत एक मोठे विधान केले आहे. पुतीन यांनी म्हटले की, मी युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्यास पूर्णपणे तयार आहे.’ मात्र पुतीन यांनी यासाठी एक अट समोर ठेवली आहे. ही अट मान्य केल्यानंतरच युद्ध थांबवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही अट कोणती आहे ते जाणून घेऊयात.
रशिया युद्ध थांबण्यास तयार, पण…
युक्रेनसोबतच्या शांतता चर्चेबाबत बोलकाना पुतीन यांनी म्हटले की, ‘आम्हाला युक्रेनकडून युद्ध थांबवण्याची कोणतीही तयारी दिसत नाही. तरीही आम्हाला आशा आहे की, युक्रेन सरकार युद्ध थांबवण्याच्या संवादात सहभागी होण्यास तयार असतील. आम्ही नेहमीच जे म्हटले आहे ते मी पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही हा संघर्ष शांततेने संपवण्यास तयार आणि इच्छुक आहोत. जर आम्हाला आमच्या सुरक्षेची हमी दिली गेली तर मी युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्या तयार आहे. आता पुतीन यांची ही अट मान्य होणार का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही भाष्य
पुतीन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांबद्दलही भाष्य केले आहे. पुतीन म्हणाले की, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे युद्ध संपवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. पुढे बोलताना पुतीन यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, ‘अँकरेजमध्ये आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावांशी सहमत झालो होतो. मॉस्कोमधील बैठकांमध्ये आम्हाला काही प्रस्ताव देण्यात आले होते आणि काही तडजोड करण्यास सांगितले होते, मात्र मी अँकरेजमध्ये पोहोचलो तेव्हा मी त्यांनी सांगितले होते की हे आमच्यासाठी सोपे निर्णय नसतील.
गेल्या 4 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू
रशियन राष्ट्राध्यक्ष दरवर्षी देशभरात कॉल-इन शो आयोजित करतात, ज्यात रशियन लोकांना पुतीन यांना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळते. पुतीन हे गेल्या 25 वर्षांपासून देशाचे नेतृत्व करत आहेत. गेल्या 4 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. सुरुवातीपासून अमेरिका हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र याला अद्याप यश आलेले नाही.
Leave a Reply