
मुंबईच्या कांदिवली पश्चिम भागातील एकतानगर येथे स्थानिक गुंडांच्या दोन गटांमध्ये राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच कारवाईसाठी पोहोचलेल्या पोलिसांवरच गुंडांनी हात उचलला. पोलिसांनी कॉलर पकडून शिवीगाळ केली आणि मारहाणही केल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “गुंडांची मस्ती जिरवण्याची धमक पोलिसांमध्ये आहे, पण त्यासाठी सरकारनेही पोलिसांना मोकळीक द्यावी. आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी आहोत.” निवडणुकीसाठी गुंडांचा वापर झाल्यामुळे सरकार आपलेच असल्याच्या समजातून गुंडांचे धाडस वाढल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्यास सामान्य माणसाचे जगणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
Leave a Reply