
Raosaheb Danve big allegation over Abdul Sattar: कोणतीही निवडणूक असू द्या भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या कलगीतुऱ्याशिवाय जणू ती अपूर्णच असते. सत्तार नवीन सरकार आल्यापासून महायुतीतच साईडलाईन झालेले आहेत. तर आता नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीनिमित्त ते सक्रिय झाले. सिल्लोड नगरपरिषद निवडणूक त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. दरम्यान दानवे यांनी सत्तारांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सिल्लोडमध्ये अनेक जणांची नावं नोंदविण्यात आल्याचा आरोप केला आहे.
सिल्लोडमध्ये जातीय समीकरण
सिल्लोड मधलं जातीय समीकरण जर आपण पाहिलं, तर त्या ठिकाणी जातीय समीकरणाच्या हिशोबाने मतदान होतं. सदसदविवेक बुद्धीला स्मरून आणि गावातील दडपशाही मधले जे काही प्रकार आमच्या तुमच्या कानावर येतात. त्या ठिकाणी अस्तित्वात जी राजकीय मंडळी आहे त्यांच्या विरोधात मतदान होईल, असा जोरदार टोला रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला.
16000 मताची लीड एका माणसाला एका गावात भेटते. त्यामुळे त्यांनी एकदा सोक्षमोक्ष लावावा. भोकरदन मधील जवळपास 3 हजार 25 नावे सिल्लोड शहरात नोंदवल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला. अब्दुल सत्तार यांचे जावई,व्याही साऱ्या नातेवाईकांचे बाहेरचे नाव आणून सिल्लोड मध्ये टाकलेले आहेत, असा दावा दानवेंनी केला.
SIR मध्ये सर्व होईल उघड
आता एसआयआर येत आहे बघू काय होतं ते? परंतु त्या ठिकाणी जातीय समीकरणाचा परिणाम आहे. पण आम्ही चांगल्या मताने निवडून येऊ असा देखील विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. तालुक्यातील सर्व नातेगोत्यातील नाव सिल्लोड मध्ये नोंदवलेले आहेत, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती आता नगर परिषदेच्या निवडणुकीत होईल असे देखील रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
आमच्या भोकरदन मधला एक मतदार आहे, नारायण सोनवणे असं त्याचं नाव आहे. त्याच मतदाराचे नाव भोकरदन मध्ये सोनवणे नारायण आणि सिल्लोडमध्ये नारायण सोनवणे असं केलेला आहे आणि फोटो तिथल्या माणसाचा लावलेला आहे. तो फोटो वापरून त्या ठिकाणी त्याने डबल मतदान केलेला आहे त्या नावाने, हे सरळ सरळ अब्दुल सत्तार यांनी केलेला आहे असा थेट आरोप रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केला.
3 हजार 25 नावं सिल्लोडमध्ये नोंदवली
निवडणुकीच्या निकाल हाती येतील तेव्हा महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष भारतीय जनता पक्ष राहील असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. भोकरदन मधील जवळपास 3 हजार 25 नावे सिल्लोड शहरात नोंदवल्याची माहिती रावसाहेब दानवे यांची दिली. तालुक्यातील सर्व नातेगोत्यातील नाव सिल्लोड मध्ये नोंदवलेले आहेत, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती आता नगर परिषदेच्या निवडणुकीत होईल, असे दानवे म्हणाले.जालना जिल्ह्यातल्या तीनही ठिकाणी भाजप स्वबळावर लढत आहे, त्यामुळे या तीनही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.
सिल्लोडमध्ये कमळ फुलणार
भाजपा जिल्हा सचिव कमलेश कटारिया यांनी अब्दुल सत्तार यांनी शहराचा विकास नाही तर केवळ परिवाराचा विकास केला. त्यांनी मोजक्याच वस्त्यांमध्ये रस्ते केले. ज्या ठिकाणी वस्ती नाही त्या ठिकाणी रस्ते केले. विधानसभेला एक लाखांनी निवडून येणार असे दावा करणारे अब्दुल सत्तार दोन हजार चारशे मताने निवडून आले होते. सिल्लोड मध्ये यावेळेस परिवर्तन होणार आणि नगरपरिषद मध्ये भाजपची सत्ता येणार असा दावा केला.
/*! This file is auto-generated */!function(c,d){“use strict”;var e=!1,o=!1;if(d.querySelector)if(c.addEventListener)e=!0;if(c.wp=c.wp||{},c.wp.receiveEmbedMessage);else if(c.wp.receiveEmbedMessage=function(e){var t=e.data;if(!t);else if(!(t.secret||t.message||t.value));else if(/[^a-zA-Z0-9]/.test(t.secret));else{for(var r,s,a,i=d.querySelectorAll(‘iframe[data-secret=”‘+t.secret+'”]’),n=d.querySelectorAll(‘blockquote[data-secret=”‘+t.secret+'”]’),o=new RegExp(“^https?:$”,”i”),l=0;l<n.length;l++)n[l].style.display="none";for(l=0;l<i.length;l++)if(r=i[l],e.source!==r.contentWindow);else{if(r.removeAttribute("style"),"height"===t.message){if(1e3<(s=parseInt(t.value,10)))s=1e3;else if(~~s<200)s=200;r.height=s}if("link"===t.message)if(s=d.createElement("a"),a=d.createElement("a"),s.href=r.getAttribute("src"),a.href=t.value,!o.test(a.protocol));else if(a.host===s.host)if(d.activeElement===r)c.top.location.href=t.value}}},e)c.addEventListener("message",c.wp.receiveEmbedMessage,!1),d.addEventListener("DOMContentLoaded",t,!1),c.addEventListener("load",t,!1);function t(){if(o);else{o=!0;for(var e,t,r,s=-1!==navigator.appVersion.indexOf("MSIE 10"),a=!!navigator.userAgent.match(/Trident.*rv:11./),i=d.querySelectorAll("iframe.wp-embedded-content"),n=0;n<i.length;n++){if(!(r=(t=i[n]).getAttribute("data-secret")))r=Math.random().toString(36).substr(2,10),t.src+="#?secret="+r,t.setAttribute("data-secret",r);if(s||a)(e=t.cloneNode(!0)).removeAttribute("security"),t.parentNode.replaceChild(e,t);t.contentWindow.postMessage({message:"ready",secret:r},"*")}}}}(window,document);
Leave a Reply