
सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त धुरंधरचीच चर्चा आगहे. रणवीर सिंहची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचं संगीत आणि डायलॉग लोकांच्या ओठावर बसले आहेत. कलाकारांच्या अभिनयाची सुद्धा खूप चर्चा होत आहे. हा चित्रपट एक नवीन इतिहास रचतोय.
कमाईचे मागचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत. रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जितकी कमाई केली, त्यापेक्षा जास्त उत्पन्न दुसऱ्या आठवड्यात कमावलं. चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे रणवीर सिंह खूप खुश आहे. त्याने एका पोस्टच्या माध्यमातून आपलं मत मांडलय.
धुरंधर चित्रपट उत्तम आहेच. पण सर्वात जास्त कौतुक होतय ते अक्षय खन्नाचं. त्याने पाकिस्तानातील ल्यारीचा डॉन रहमान डकैत रंगवला आहे. अक्षय खन्नाचा अभिनय आणि त्याने गाण्यावर धरलेला ठेका सगळीकडे व्हायरल झाला आहे. लोक या गाण्याचे रिल्स बनवत आहेत.
खरंतर या चित्रपटात रणवीर सिंहची मुख्य भूमिका आहे. पण कौतुक मात्र सर्वात जास्त अक्षय खन्नाचं होतय. धुरंधरच्या रिलीज आधी खराब रिव्यू आणि बॅड पीआरची चर्चा होती. पण चित्रपट थिएटरमध्ये आल्यानंतर वातावरण बदलून गेलय.
'नशिबाची एक खूप सुंदर सवय आहे, वेळ आल्यावर ती बदलते. पण सध्या नजर आणि संयम….' असं रणवीरने त्याच्या इन्स्टास्टोरीमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप दिवसांनी हिंदी सिनेमात चांगलं कथानक पहायला मिळालय.




Leave a Reply