• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ranveer Singh : 8 तासांच्या शिफ्टवरून नवरा-बायकोतही वाद ? दीपिकाला चॅलेंज देत रणवीर म्हणाला..

December 15, 2025 by admin Leave a Comment


अभिनेत्री दीपिका पडूकोण (Deepika Padukone) ही गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. लेक दुआ हिच्या जन्मापासून ब्रेकवर गेलेल्या दीपिकाचा यावर्षी एकही चित्रपट आलेला नाही, मात्र काही इव्हेंट्समध्ये ती जरूर दिसली. मातृत्वाचा अनुभव घेणाऱ्या दीपिकाने काही दिवसांपूर्वी केलेल वक्तव्य अजूनही गाजत असून त्याचीच सगळीकडे चर्चा होताना दिसते, अनेक सेलिब्रिटीही त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दीपिकाने फिल्म इंडस्ट्रीत 8 तासांच्या शिफ्टची मागणी केली होती. याच मागणीच्या वादामुळे तिने ‘स्पिरिट’ आणि ‘कल्कि 2898 एडी पार्ट 2’ दोन मोठे प्रोजेक्ट्सही सोडल्याची चर्चा होती. त्यावरून तिच्यावर बरीच टीका झाली, तर काहींनी तिची बाजून उचलून धरत मागणी योग्य असल्याचेही म्हटले होते.

मात्र या सर्व मुद्यावर तिचा पती, अभिनेता रणवीर सिंगचं (Ranveer Singh) काय मत आहे ? सध्या रणवीरचा एक जुना व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला असून त्यामध्ये त्याने केलेलं वक्तव्य हे दीपिकाच्या मुद्याशी, मागणीशी संपूर्णपणे विसंगत असल्याचं दिसत आहे. एक्स्ट्रॉ वर्किंग अवर्सबद्दल बोलत रणवरीने सहमती दर्शवल्याचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

करा ना थोडं जास्त शूटिंग…

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ बॉक्स ऑफीसवर धमाकेदार कामगिरी करत असून त्यामुळे तो चित्रपटाचं यश चांगलंच एन्जॉय करत आहे. सगळीकडे त्याच्या याच चित्रपटाची, त्याच्या परफॉर्मन्सची चर्चा सुरू आहे. पण याचदरम्यान आता रणवीरचा एका जुना इंटरव्ह्यू व्हायरल झाला आहे, ज्यामुळे आता सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. त्यामुळे चाहते दोघांच्या विचारसरणीबद्दल आणि या जुन्या इंटरव्ह्यूबद्दल हिरहिरीने चर्चा करताना दिसत आहेत. रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे, त्यातील व्हिडीमध्ये रणवीर सिंग हा एक्स्ट्रॉ वर्किंग अवर्स शिफ्ट बद्दल बोलताना दिसतोय.

खरंतर हा व्हिडिओ 2022 सालचा आहे, जेव्हा रणवीर सिंगने बॉलिवूड हंगामाशी बोलताना एक्स्ट्रा वर्किंग अवर्सला पाठिंबा दर्शवला होता. व्हिडीओत तो म्हणतो – ” अनेत लोकं (मला) म्हणतातस की तू सगळ्यांना बिघडवतोयस. सगळे म्हणतात की 8 तासांच्या शिफ्टमध्ये तू कधी 10 -12 तास शूटिंग करतोस, मग आम्हालाही करावं लागतं. पण मग आपल्याला जे हवंय ते (काम) 8 तासांच्या शिफ्टमध्ये नाही झालं, मग ठी आहे ना, करा थोडं जास्त शूटिंग” असं रणवीरने त्यात म्हटलं होतं.

 

Ranveer Singh on 10-12 hours shifts 😏😏
byu/Useful-Sherbet1683 inBollyBlindsNGossip

पण यामुळे रणवीर आणि दीपीका या दोघांचा कामाच्या तासांबद्दलचा हा वेगेवगळा दृष्टीकोन चर्चेत आला असून चाहत्यांचीही त्यावर वेगवेगळी मतं समोर येताना दिसत आहेत.

‘धुरंधर’साठी 16-18 तास शूटिंग

रणवीर सिंग सध्या त्याच्या “धुरंधर” चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी, “धुरंधर” चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी खुलासा केला होता की कलाकार आणि क्रूने चित्रपटावर खूप मेहनत घेतली आहे. एवढंच नव्हे तर ‘धुरंधर’ यशस्वी व्हावा यासाठी, कलाकारांनी जवळजवळ दीड वर्षांपर्यंत 16 ते 18 तासांपर्यंत शूटिंग केलं होतं. खरंतर हा दीपिकाला टोमणा होता, असंही तेव्हा अनेकांना वाटलं होतं.

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अंकशास्त्रातील 11, 22, 33 ‘या’ आकड्यांचे रहस्य काय? सर्वात भाग्यवान का मानले जाते? जाणून घ्या
  • फक्त बिअर, रम नव्हे तर दारुचे हे प्रकारही एकदम भारी; जगभरात आहेत प्रसिद्ध!
  • महिला कमरेखाली सोन्याचे दागिने का घालत नाही? 99 टक्के तुम्हाला माहिती नसेल कारण
  • FA9LA Song Viral Video : तू नको बाबा.. अक्षय खन्नाच Best ; शाहरुख बनला रेहमान डकैत, नेटकऱ्यांनी थेट…
  • Photos: रामायणातील ही ठिकाणे आजही भारतात आहेत अस्तित्वात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in