
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांचा मुंबई दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात ते मुंबईतील विविध शाखांना भेटी देत असून, मनसेच्या नवीन शाखांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येत आहे. राज ठाकरे सध्या भांडूपमध्ये दाखल झाले असून, त्यांनी भांडूप पश्चिम येथील वाघोबावाडी परिसरातील शाखा क्रमांक १०९ चे उद्घाटन केले. या भेटीगाठीदरम्यान राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मनसेने निवडणुकीसाठी कंबर कसली असून, जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पक्षाची मोट बांधण्यासाठी शाखा विस्तार मोहीम हाती घेतली आहे. आज ते भांडूपसह गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, भायखळा आणि ताडदेव परिसरातील एकूण सात ठिकाणी भेटी देणार आहेत.
Leave a Reply