
Nameless Railway Station In India: भारतीय रेल्वे हा देशात फिरण्याचा सोप्पा, सुरक्षित आणि स्वस्थ पर्याय आहे. भारतीय लोक दूरच्या प्रवासासाठी रेल्वेने जाणे पसंत करतात. रेल्वेची हजारो स्टेशन देशात आहेत. प्रत्येक रेल्वे स्टेशनचे नाव दर्शनी भागात आपल्याला दिसते. त्याआधारे त्या रेल्वे स्टेशनची, गावाची ओळख आपल्या होते. पण देशात एक रेल्वे स्टेशन असे पण आहे, ज्याचे नावच नाही. या रेल्वेस्टेशनवर नामफलक आहे. पण त्यावर त्या गावाचं नावच नाही. रेल्वे स्टेशच्या त्या पिवळ्या पाटीवर काहीच नाव नाही. केवळ पिवळी पाटी आहे. कारण तरी काय?
तो किस्सा तरी काय?
तर ही कहाणी सुरु होते वर्ष 2008 मध्ये. तेव्हा या ठिकाणी रेल्वेने नवीनच एक स्टेशन उभारले. हे स्टेशन दोन गावांमध्ये रैना आणि रैनागड या दोन गावांच्या मध्यभागी पडते. रेल्वेने सुरुवातीला याचे नाव अगोदर रैनागड असे ठेवले. पिवळ्या पाटीवर रैनागड असे लिहिल्या गेले. रैनागडचे लोक यामुळे आनंदीत झाले. पण रैना गावाच्या लोकांना ही बाब काही पटली नाही. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. या दोन्ही गावात कडाक्याचं भांडण झालं. रैना गावातील लोकांनी या पाटीवर रैना गावाचं नाव देण्याची मागणी केली. दोन्ही गावातील मंडळींनी आंदोलन केलं. रेल्वे स्टेशन आणि पार वरिष्ठ कार्यालयाबाहेर धरणं दिलं. इतकेच काय थेट कोर्टात झगडा पोहचला. याचा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना चांगला ताप झाला. रोजच यावरून वाद सुरू होता. मग रेल्वेने दोन्ही गावकऱ्यांना तोडगा काढण्या सुचवले. पण उपयोग झाला नाही. मग रेल्वेने पिवळ्या बोर्डावरील नाव हटवलं आणि परत या स्टेशनला नावच दिलं नाही. गेल्या 17 वर्षांहून अधिक काळापासून या बोर्डावर कोणत्याच गावाचं नाव लिहलं गेलं नाही. इथं केवळ पिवळी पाटी आहे.
रेल्वे थांबते, तिकीट काऊंटर पण पाटी नाही
अर्थात पिवळ्या पाटीवर नाव नसले तरी येथे रेल्वे थांबतात. लोकल पॅसेंजर दिवसात 6 वेळा धावते. प्रवासी चढउतार होतात. तिकीटावर मात्र रैनागड असंच नाव छापून येते. विशेष म्हणजे या रेल्वे स्टेशनला रविवारी सुट्टी असते. म्हणजे रविवारी रेल्वे येथे थांबत नाही. कारण येथील स्टेशन मास्तर बर्धमान येथे जाऊन तिकिटाचा आणि पैशांचा हिशोब देतो. हे नाव नसलेले रेल्वे स्टेशन पश्चिम बंगाल राज्यात आहे. बर्धमान या शहरापासून हे रेल्वे स्टेशन जवळपास 35 किलोमीटर दूर आहे. बांकुरा -मेसाग्राम या रेल्वे मार्गावर हे स्टेशन आहे.
Leave a Reply