• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Railway: भारताचे एकमेव रेल्वे स्टेशन, जिथं प्लॅटफॉर्म तिकीट नाही दाखवावा लागतो पासपोर्ट, नाव ऐकून बसेल धक्का

December 27, 2025 by admin Leave a Comment


Passport instead Platform Ticket:  भारतीय रेल्वेच्या इतिहास अनेक मनोरंजक आणि आश्चर्यचकीत करणाऱ्या गोष्टी आहेत. कुठे रेल्वे स्टेशनचे नाव नाही, तर काही ठिकाणी एकच रेल्वे स्टेशन दोन राज्यात येते. तिथे दोन तिकीट विक्री केंद्र आणि दोन वेगवेगळ्या भाषेतील उद्धघोषणा होते. पण या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट नाही थेट पासपोर्ट दाखवावा लागतो असं जर कुणी सांगितलं तर? तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा आहे? पण खरंच या रेल्वे स्टेशनवर दाखल होण्यासाठी पासपोर्ट दाखवावा लागतो. त्यामागील कारण ही तसंच आहे. कारण हे स्टेशन अत्यंत संवेदनशील ठिकाणी आहे. हे रेल्वे स्टेशन दोन देशाच्या सीमेवर आहे.

भारताचे अखेरचे संवेदनशील रेल्वे स्टेशन

पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील अटारी रेल्वे स्टेशन हे भारतातील अखेरचे रेल्वे स्टेशन आहे. अटारी रेल्वे स्टेशन हे भारतातील शेवटचे स्टेशन आहे. हे स्टेशन भारत आणि पाकिस्तानच्या सीमा रेषेवर आहे. एकेकाळी ‘समझोता एक्सप्रेस’चा मुख्य थांबा या ठिकाणी होता. येथे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पासपोर्ट आणि व्हिसा दाखवावा लागत असे. कागदपत्रांशिवाय प्रवासी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायची. येथे दोन्ही देशातील सुरक्षा दल प्रवाशांवर बारीक पाळत ठेवत. कारण हे केवळ रेल्वे स्टेशन नव्हते तर दोन्ही देशातील संवेदनशील प्रवेशद्वार होते.

समझौता एक्सप्रेस झाली बंद

१९७१ मध्ये इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात शिमला करार झाला. त्यात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी १९७६ मध्ये समझौता एक्सप्रेस सुरू करण्यात आली. ही रेल्वे अटारी ते लाहोर या दोन शहरांदरम्यान धावत होती आणि हजारो लोक वर्षानुवर्षे या रेल्वेने प्रवास करत होते.सुरुवातीला ही रेल्वे रोज धावत होती. पण पाकिस्तानच्या कुरापती आणि दोन्ही देशातील संबंध ताणल्याने ती पुढे आठवड्यातून दोन दिवस धावत होती.२०१९ मध्ये भारताने कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा जळपळाट झाला आणि ही सेवा बंद झाली.सर्वात कमाल म्हणजे या भारतीय ट्रेनचे ११ डबे लाहोरमध्ये अडकले आहेत. तर पाकिस्तानी ट्रेनचे १६ डबे आज अटारी स्टेशनवर आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Dhurandhar Worldwide Collection: अक्षय खन्नाने शाहरुख खानलाही टाकले मागे? जगभरातील कमाईचा आकडा ऐकून बसेल धक्का
  • Railway: भारतातील नाव नसलेले ते एकमेव रेल्वे स्टेशन; प्लॅटफॉर्मवरील पिवळ्या बोर्डाला प्रतिक्षा नावाची, काय तो खास किस्सा
  • 2026 मध्ये तुमचं घर आनंदाने भरलेलं राहण्यासाठी ‘या’ 5 गोष्टीं घरात करा समाविष्ट
  • Vastu Shastra : घोड्याशी संबंधित करा हा सोपा उपाय, आयुष्यात पैसा कमी पडणार नाही
  • Team India : 1 मालिका, 3 सामने-15 खेळाडू, वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन दुखापतीमुळे आऊट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in