
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाच्या बैठकीतून शिंदे सेनेचे स्थानिक नेते रवींद्र धंगेकर यांना वगळण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने धंगेकरांना बैठकीत बोलावण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे शिंदे सेनेने आपल्याच स्थानिक नेत्याला निमंत्रण न देता भाजपसोबत ही बैठक उरकली. या बैठकीत भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तर शिंदे सेनेकडून मंत्री उदय सामंत, विजय शिवतारे आणि विधानपरिषदेच्या नीलम गोऱ्हे यांनी हजेरी लावली होती. मूळ पुण्यातील धंगेकरांना मात्र या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. यामुळे शिंदे गटात अंतर्गत विसंवाद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. धंगेकर यांनी आपल्याला अद्याप निमंत्रण आले नसल्याचे म्हटले आहे.
Leave a Reply