• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Prithviraj Chavan: …त्यावेळी बरेच जण गुडघ्याला बाशिंग बांधून! पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्री पदासाठी उतावीळ काँग्रेस नेत्यांना चिमटा

December 16, 2025 by admin Leave a Comment


लक्ष्मण जाधव/प्रतिनिधी : 19 डिसेंबर यायला आता अवघे तीन दिवस उरले आहेत. अमेरिकेत यादिवशी काही कागदपत्रं समोर येतील आणि जगभरात खळबळ उडेल. अनेक राजकीय नेत्यांचे स्टींग ऑपरेशन समोर येईल. या उलथापालथीचा भारतावरही परिणाम होईल. कदाचित भारताचा पंतप्रधान बदलेल. मराठी माणूस पंतप्रधानपदी असेल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी केला आहे. चव्हाण हे सरळमार्गी नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य राजकीय विश्लेषकांनी गांभीर्याने घेतले आहे. तर दुसरीकडे चव्हाण यांनी आता स्वपक्षातील काही नेत्यांना(Prithviraj Chavan on Congress Leaders) चांगलाच चिमटा काढला आहे.

मुख्यमंत्री पदासाठी काही जणांचे गुडघ्याला बाशिंग

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पुणे पत्रकार भवनात एक विधान केले आहे. या वर्षभरात राजकारणात बरचे काही घडले आहे. विधानसभांच्या निवडणूकमध्ये आतिआत्मविश्वासाचा आम्हाला फटका बसला अशी प्रांजळ कबुली चव्हाण यांनी दिली. पण त्यावेळी अनेक जणांनी काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चिमटा काढायला पृथ्वीराज चव्हाण विसरले नाहीत. त्यांनी हा निशाणा कुणावर साधला हे वेगळ सांगायची गरज नाही.

बोगस मतदानावर तोंडसुख

राहुल गांधीनी बोगस मतदानाचा मोठा मुद्दा हाती घेतला आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे. ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथं करता येईल तिथं भाजपने पोलराईस केले. पराभूत झालेल्या उमेदवारांना सांगितले की याचिका दाखल करा. आम्ही याचिका दाखल केलेल्या आहेत त्यांची सुनावणी सुरू आहे. मी पण याचिका दाखल केलेली आहे. आमच्या मतदार मध्ये बोगस मतदान नोंदणी केलेली आहे. कॉंग्रेस पक्षाचे २८८ मतदार संघातील माहिती गोळा केलेली आहे. निवडणूक निकाल लागला की सर्वच म्हणतात माझ्यावर अन्याय झाला. निवडणूक आयोगाने योग्य काम केले पाहिजे. निवडणूक यादी मध्ये एका माणसाला एकाच ठिकाणी मतदान करु शकतो. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदान कसं काय होऊ शकते असा सवाल त्यांनी केला.

माझ्या मतदार संघात १२ हजार बोगस मतदार आहेत. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की मतदार यादी स्पष्ट असली पाहिजे. मला पाठीमागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतं पडली मग तरी पराभव कसा झाला. निवडणूक आयोगाला यावर उपाय करणं शक्य आहे पण ते करत नाही कारण त्यांना सत्ताधारी पक्षाला लाभ मिळवून द्यायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

हे जे काय चाललंय याला भाजपाचे केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे. नरेंद्र मोदी याला जबाबदार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे पण तो बाहेर काढायला आम्ही कमी पडतं आहोत. त्यांना पाश्ववी मतदान मिळालं आहे. पण आम्ही भांडत आहोत. आपल्या महाराष्ट्रात एक ही मोठा प्रकल्प येत नाही यांना लाज वाटली पाहिजे. सरकार हे झोपलेलं आहे हे सरकार कमीशनचे सरकार सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगार सध्या सुरू आहे.विरोधक म्हणून आम्ही कमी पडतोय कारण आमचे संख्याबळ कमी आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आता 19 डिसेंबरला पाहु काय होते ते

मी ते बोललो त्यामुळे कुतुहल निर्माण झाले आहे. मी ते का बोललो त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. 19 डिसेंबर महत्वाचे आहे तो पर्यंत पाहु आपण काय होतोय ते, असे चव्हाण म्हणाले. बाहेरून अणुभट्ट्या मागवायचा निर्णय सरकारने निर्णय घेतला आहे. २००८ पासून परदेशी कंपन्या भारतात आल्या नव्हत्या. अदाणीला या क्षेत्रात प्रवेश द्यायचा असा सरकारने निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की आम्ही अणुचाचण्या करणार. त्यांनी केल्या म्हटल्यावर रशिया करणार पण भारत पण करणार पण आम्ही त्याला विरोध करणार असे त्यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तान सोबत सुरू केलेले युद्ध मोठी घोडचूक होती असे वक्तव्यही चव्हाण यांनी केले. आपली पाकिस्तान पेक्षा १० पट मोठी अर्थव्यवस्था आहे. मोदी यांनी युद्ध थांबवायचं का मान्य केले. युद्धाच्या पहिल्याच दिवशी आपला पराभव झाला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. मोदींवर कसला दबाव आहे ते उत्तर आपण शोधले पाहिजे. मोदींवर अमेरिकाचा दबाव आहे. परराष्ट्र धोरणामध्ये आपण मागे आहोत. परराष्ट्र धोरणामध्ये आपल्याला अपयश आल्याचा आरोप त्यांनी केला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ॲल्युमिनियम फॉईलमध्ये चपाती बांधताय?, डॉक्टरांनी केले सावध, पाहा काय म्हणाले
  • IPL 2026 Auction: फक्त 4 सामनेच खेळणार, तरीही फ्रँचायजीकडून कोटींचा भाव, कोण आहे तो?
  • नितीश कुमार यांनी हिजाब हटवातच पाकिस्तानचा जळफळाट, थेट या गोष्टीची केली मागणी… प्रतिक्रिया काय?
  • Eggs Safety : अंडी खाणाऱ्यांनो सावधान! अंड्यात सापडले नायट्रोफ्युरान्स ? FSSAI ने दिले तपासण्याचे आदेश
  • वसुधैव कुटुंबकम हे भारताच्या संस्कृतीविषयक ज्ञानाचे प्रतिबिंब – प्रो. मझहर आसिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in